परभणी : परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये 49 व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी मंत्री गिरीश महाजनांनी कब्बडीमुळं मी कसा आमदार झालो याचा किस्सा सांगितला. तसेच राजकारणात कबड्डीचा त्यांना कसा फायदा होतो हे त्यांनी सांगितलं.
राजकारणात कोणाल कसं बाद करायचं आणि कोणाला कसं पाडायचं हे मी कबड्डीतूनचं शिकलो असल्याचे महाजन यांनी सांगितले. कबड्डी हा ताकदीचा आणि स्कीलचा मैदानी खेळ आहे. मी कबड्डी खेळत असल्यामुळं इतक्या वेळेला आमदार झालो. या खेळाचा मला राजकारणात फायदा होत असल्याचे महाजन म्हणाले.
या खेळात कोणाची टांग कशी ओढायची, कोणाची कॅच कशी करायची, समोरच्याला कसं टिपायचं आणि एखादा खेळाडू एकतच नसेल तर त्याला ग्राऊंडच्या बाहेर कसं पुश करायचे हे या खेळात मी शिकलो असल्याचे महाजन म्हणाले. राजकारणातही मी तेच केलं, कोणाची टांग कशी खेचायची, कोणाला कसा बाद करायचा, कोणाला कसं पाडायचं हे मी या खेळातून शिकल्याचे महाजन म्हणाले.
हे पण वाचा..
अरे वा.. शिधापत्रिकाधारकांना मिळणार 2500 रुपये, तुम्हाला मिळेल का?
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर खडसेंची प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले..
आजचे राशीभविष्य : या राशींच्या लोकांनी आज व्यवहारात सावधगिरी बाळगावी, अन्यथा..
मामी पडली भाच्याच्या प्रेमात, एकेदिवशी मामाने दोघांना रंगेहात पकडले, अन्..
दरम्यान, परभणीच्या गंगाखेड येथील दिवंगत माणिकराव गुट्टे क्रीडानगरीत लाल मातीची सहान मैदान तयार करण्यात आली आहेत. त्यावर दुपारी चार ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत कबड्डीचे सामने प्रकाशझोतात सुरू आहेत. राज्यभरातील 25 मुलांचे आणि 25 मुलींचे असे एकूण 50 विविध जिल्ह्याचे कबड्डी संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पहिल्याच दिवशी अतिशय रंगतदार सामने इथे पाहायला मिळाले. स्वतः क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर बराच वेळ या सामन्यांचा आनंद घेतला.