पुणे : भारतीय नौदल प्रथमच महिला खलाशांना सेवेत सामावून घेत आहे. चीफ अॅडमिरल आर हरी कुमार यांनी ही माहिती दिली. भारतीय नौदल प्रमुख म्हणाले की, 3000 अग्निवीर भारतीय नौदलात सामील होत आहेत, त्यापैकी 341 महिला आहेत. नौदल प्रमुख म्हणाले की, भारतीय नौदलात उपलब्ध पदांसाठी अर्ज केलेल्या 10 लाख व्यक्तींपैकी 82 हजार महिला होत्या. पुढील वर्षीपासून महिला अधिकाऱ्यांसाठी सर्व शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सशस्त्र दलात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.
पुण्यातील खडकवासला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) पासिंग आऊट परेडला संबोधित करताना नौदल प्रमुखांनी ही माहिती दिली. नौदल प्रमुख म्हणाले, सध्या आम्ही 341 महिला अग्निवीरांना नौदलात सामील केले आहे. महिलांना प्रथमच रँकमध्ये समाविष्ट केले जात आहे. महिलांना वेगळे समाविष्ट केले जात नाही. त्यांना पुरुषांप्रमाणेच संधी दिली जात आहे. ही निवडीची एकसमान पद्धत आहे. त्यांना जहाजे, एअरबेस, विमानांवर तैनात केले जाणार आहे. सामान्य खलाशांना ज्या प्रकारे प्रशिक्षण दिले जाते त्याप्रमाणे त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणात कोणताही फरक केला जाणार नाही, असेही ॲडमिरल आर हरी कुमार यांनी सांगितले.
2047 पर्यंत नौदल नौदलास आत्मनिर्भर होणार
अलीकडील जागतिक स्तरावरील काही घटना अधोरेखित करतात की आम्ही आमच्या स्वतःच्या सुरक्षेच्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहू शकत नाही. आत्मनिर्भर भारताबद्दल केंद्र सरकारने आम्हाला अतिशय स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत आणि आम्ही 2047 पर्यंत नौदलास आत्मनिर्भर नौदल बनू, असेही ते म्हणाले.
सर्व शाखा सुरू होणार
नौदलात प्रमुखांनी सांगितले की, यापूर्वी भारतीय नौदलात फायटर पायलट आणि महिला एअर ऑपरेशन अधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात आला होता. मात्र आता महिला खलाशांचीही भरती केली जात आहे. पुढच्या वर्षी उर्वरित सर्व शाखांमध्ये महिलांना प्रवेश दिला जाईल, असे नौदल प्रमुख म्हणाले.
82000 महिलांनी अर्ज केले
नौदल प्रमुख म्हणाले होते, ‘आम्हाला चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. 3000 रिक्त पदांसाठी 10 लाख लोकांनी अर्ज केले होते, त्यापैकी 82,000 महिला होत्या. त्यापैकी किती सर्व मानके पूर्ण करणार आहेत हे आम्हाला अद्याप माहित नाही. सध्या आपल्याकडे शिक्षण आणि शारीरिक पात्रतेसाठी वेगळे मानक नाहीत, कारण नोकरी एकच आहे.