नवी दिल्ली : देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यामुळे महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, अशातच झारखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. लहान बहीण बरोबर असताना तिच्या समोर मोठ्या बहिणीवर दोघांनी बलात्कार केला आहे. पीडिता बेशुद्ध झाल्यावर नराधमांनी तिला सलैया जंगलात सोडून पळ काढला.
लहान बहिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मोठी बहीण बेशुद्ध झाल्यावर तिने कसेबसे तिला शुद्धीवर आणत बोडी येथील बहिणीचे घर गाठले. तिथे पोहचल्यावर दोघींनी घडलेला प्रकार घरी सांगितला. त्यानुसार कुटुंबीयांनी दोघींसह पोलीस स्टेशन गाठले. अशात पीडित मुलींनी आरोपींविषयी दिलेल्या वर्णनावरून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नेमकी काय आहे घटना?
पीडित मुलींनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, २९ नोव्हेंबर रोजी त्या दोघी बहिणी बोडी गावात त्यांच्या आणखीन एका मोठ्या बहिणीकडे (Sister) जात होत्या. चार हुमाणीजवळ त्या पोहचल्या असता मागून एक वॅन आली. या गाडीत चालकासह आणखीन एक व्यक्ती बसला होता. पीडित मुलीने बोडी येथे जायचे आहे सांगून लिफ्ट मागितली. त्यावेळी वाहन चालक आणि दुसऱ्या व्यक्तीने आम्हालाही तिथेच जायचे आहे असे सांगत मुलींना लिफ्ट दिली.
हे पण वाचा..
8 वर्षांचा मुलगा लिफ्टमध्ये अडकला, अन् मग.. पाहा हा VIDEO
श्रद्धासारखीच आणखी एक घटना ! जंगलात नेऊन बॉयफ्रेंडने प्रेयसीवर गोळी झाडली, नंतर…
पोरांनो तयारीला लागा.. राज्यात लवकरच 4122 तलाठ्यांची भरती होणार
‘या’ आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी रोज नारळाचे पाणी प्यावे.. जाणून घ्या फायदे
मात्र त्या दोघांची नियत फिरली आणि त्यांनी गाडी थेट सलैया जंगलात थांबवली. त्यांनी दोन्ही बहिणींना बेदम मारहाण केली. त्यानंतर मोठ्या बहिणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. यावेळी लहान बहीण तिथेच होती. आपल्या बहिणीला वाचवण्याचा तिने खुप प्रयत्न केला. मात्र त्या नराधमांनी तिला देखील मारहाण केली. अशात पीडिता बेशुद्ध होईपर्यंत ते लैंगिक अत्याचार करत राहिले आणि नंतर तिथून पळ काढला.