तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे राज्यात लवकरच तलाठी पदाच्या ४१२२ पदांची महाभरती होणार आहे. त्याबाबतची कार्यवाही महसुल विभागाकडून सुरू करण्यात आली असून प्रत्येक विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय तपशील सादर करण्यास शासनाने सूचीत केले आहे. त्यामुळे आता सुशिक्षीत तरुणांना नोकरीची चांगली संधी मिळणार आहे.
राज्यात तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. सध्या तीन ते चार गावांसाठी एक तलाठी अशी सद्यःस्थिती आहे. परिणामी गावातील कामांवर, लोकांना मिळणाऱ्या सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. तलाठ्यांची रिक्त पदे भरून नवीन सजे निर्माण करून त्यांचीही भरती करण्याची मागणी राज्य तलाठी संघाच्यावतीने शासनाकडे अनेकदा करण्यात आली होती.
हे पण वाचा :
राज्यातील या ठिकाणी 10वी ते पदवीधर उमेदवारांसाठी मोठी भरती
Income Tax मध्ये या पदांसाठी भरती.. नोकरीची ठिकाण जळगावसह या जिल्ह्यांमध्ये
खुशखबर.. केंद्रीय विद्यालय संघटनेमध्ये 13 हजाराहून अधिक पदांसाठी भरती
नाशिकमधील नोटा छापण्याच्या कारखान्यात सरकारी नोकरीची संधी; 95,000 रुपये पगार मिळेल
अशातच आता राज्यात तलाठी पदाच्या ४१२२ पदांची महाभरती लवकरच सुरु होणार आहे. या संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला आहे. नवीन माहिती पत्रकानुसार नाशिक विभागात १०३५, औरंगाबाद विभागात ८४७, कोकण विभागात ७३१, नागपूर विभागात ५८०, अमरावती विभागात १८३ तर पुणे विभागात ७४६ अशा एकूण ४१२२ पदांची महाभरती लवकरच सुरु होणार आहे.