जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड यांची झालेली अचानक बदली आदेशाला महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाच्या (मॅट) औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.दरम्यान महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त म्हणून देवीदास पवार यांनी पदभार स्वीकारलेला असून महापालिका आयुक्तपदी नेमके कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आयुक्त विद्या गायकवाड यांना सात महिन्यांपूर्वी पदोन्नतीवर जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती मिळाली होती. त्यानंतर त्यांचा तीन वर्षांचा नियमित कालावधी पूर्ण होण्याआधीच किंवा कोणतेही विशेष कारण नसतांना त्यांची अचानक बदली करून त्यांच्या जागेवर राज्य सरकारने देवीदास पवार यांची नियुक्ती केली होती मात्र या बदली आदेशा विरुद्ध आयुक्त विद्या गायकवाड या महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाच्या (मॅट) औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती. त्यावर सुनावणी होऊन बदली आदेशाला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.