चाळीसगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातून मनाला सुन्न करणारी घटना समोर आली असून या घटनेनं चाळीसगाव हादरलं असून हळ हळ व्यक्त होतं आहे, लग्नानंतर दोनही मुलीचं जन्माला आल्या म्हणून पतीने त्या चिमुकल्यांच्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला व त्यानंतर स्वत: देखील रेल्वेखाली झोकून देत स्वतःचे जीवन संपवत आत्महत्या केली.
सविस्तर असे की, चाळीसगाव येथील रहिवाशी असलेले सुरज दिलीप कुऱ्हाडे (वयवर्ष २८) याने आधी पत्नी रेश्मा सुरज कुऱ्हाडे हिला संपवले व नंतर स्वतःही आत्महत्या केली रेश्मा आणि सुरज यांच्या विवाहला तीन वर्ष झाले होते, सुरज हा आपल्या परिवारासह चाळीसगाव शहरातील जय गणेश नगर येथे राहत होते. हाताला मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करत होते. सुरज यास मुलाची इच्छा असतांना लग्नानंतर पहिल्यांदा मुलगी जन्माला आली म्हणून तो पत्नीशी भांडायचा देखील त्यात दारूची सवय होती.४ महिन्यापूर्वी रेश्मा दुसऱ्या डिलिव्हरीसाठी माहेरी गेली होती…दुसऱ्या वेळेसही मुलगीच झाल्याने सुरज पत्नीला घेऊन दोन दिवसापूर्वीच घरी आला होता.
दोन दिवस उलटल्यावर आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास दोनही वेळी मुलीचं झाल्या म्हणून दोघांमध्ये वाद झाला आणि वाद विकोपाला जाऊन पती सुरजने पत्नी रेश्माच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केला व स्वतःचे जीवन संपवले. दरम्यान आई आणि वडील दोघेही नसल्याने मात्र चिमुकल्या मुली पोरक्या झाल्याने सर्वत्र हळ हळ व्यक्त होतं आहे.
हे सुद्धा वाचा..
Digital Rupee : आता रोख पैशांची गरज संपणार! जाणून घ्या कसा कराल वापर
Indian penal code ; भारतीय दंड संहिता मधील कलम १५३ काय आहे, जाणून घ्या…
खबरदार पुरुषांनो! आता महिलांकडे 14 सेकंद पाहिल्यास होणार तुरुंगवास
Mantralaya News ; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ निर्णय !
आईच्या कष्टाचं पोरानं केलं चीज; MPSC परीक्षेत हर्षलची भरारी
दुध संघ निवडणूक ; आ. किशोरअप्पा पाटील यांच्या ‘खेळी’ ने सर्वानाचं आश्चर्याचा धक्का!
केंद्र सरकारचा रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा! रेशनचा नवा नियम देशभर लागू
कापूस मोजणीत मापात पाप करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी धू धू धुतलं; पाहा VIDEO