जालना : 4 वर्षांच्या मुलीने तिच्या चुलत 5 वर्षांच्या बहिणीवर ब्लेडने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. ही घटना जालन्यातील चौधरी नगर परिसरात घडलीय. ईश्वरी रमेश भोसले असं मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी याबाबत कसून तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ईश्वरी रमेश भोसले ही शिक्षणासाठी आपल्या काकांकडे जालन्यात राहत होती. 14 वर्षीय चुलत बहिणीने तिचा खून केला. शाळेत जाण्यासाठी घरचे सतत तगादा लावत असल्याने आपल्या चिमुरड्या चुलत बहिणीचा तिने ब्लेडने वार करून खून केल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. ईश्वरीचा खून हा चुलत बहिणीने रागाच्या भरात केल्याचे पुढे आले आहे. संशयित अल्पवयीन मुलीने मागील आठवड्यात शाळेत मोबाइल फोन चोरला होता. ही मोबाइल चोरी शाळेच्या मुख्याध्यापकांनी पकडली असल्याचीही माहिती मिळाली आहे.
तिने मोबाईल चोरल्यानंतर या घटनेची शाळेत जोरदार चर्चा रंगली होती. या कारणावरून संशयित अल्पवयीन मुलगी मागच्या काही दिवसांपासून शाळेत गेली नसल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तिने शाळेत जावे, यासाठी कुटुंबीय सतत तगादा लावत होते. मोबाइल चोरी पडल्याने संशयित अल्पवयीन मुलगी ही शाळेत जाण्यास तयार नव्हती.
हे पण वाचा..
केंद्र सरकारचा रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा! रेशनचा नवा नियम देशभर लागू
या राशीच्या लोकांना आजचा दिवस पडू शकतो भारी, जाणून घ्या आजचे राशिभविष्य?
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीबाबत सर्वात मोठी बातमी, या तारखेपर्यंत निवडणूक स्थगित?
याच रागाच्या भरात तिने सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या अंघोळीसाठी गेलेल्या ईश्वरीचा बाथरूममध्ये खून केला. अल्पवयीन मुलीने ईश्वरीच्या हातावर, गळ्यावर, चेहऱ्यावर वार केल्याची माहिती तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी वडते यांनी दिली. दरम्यान, संशयित अल्पवयीन मुलीला बालसुधारगृह येथे ठेवण्यात आले आहे.