जळगाव : सावदा येथे भाजपचे तालुकाध्यक्ष तथा गोरक्षक जितेंद्र किसन भारंबे यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याच्या निषेधार्थ आज सावदा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी व दुकानदार तसेच व्यवसायिकांनी बंदला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिल्याने संपूर्ण शहरात शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले.
नेमकी काय आहे घटना?
सावदा शहरातील मोठ्या मारुती मंदिराजवळ जवळ जितेंद्र भारंबे (४२) हे वास्तव्यास आहेत. ते भाजपचे तालुकाध्यक्ष असून गोरक्षक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. सोमवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास सावदा शहरातील कत्तलखाना जवळ जितेंद्र भारंबे यांच्यावर तीस ते चाळीस जणांनी लाठ्या-काठया, तलवार तसेच बंदुकीचा वापर करत जीवघेणा हल्ला केला. या घटनेत जितेंद्र भारंबे जखमी झाले असून या प्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा..
तरुणांसाठी खुशखबर… राज्याच्या पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, ही आहे शेवटची तारीख?
Video : प्रियकरावरून भांडण, 5 मुलींनी तरुणीला दिला जबरदस्त चोप… पाहा व्हिडीओ
कापूस मोजणीत मापात पाप करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी धू धू धुतलं; पाहा VIDEO
या हल्ल्याचा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनीही तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. गोरक्षणासाठी जर कार्यकर्ते पदाधिकारी अशा पद्धतीने जर चांगलं काम करत असतील तर त्यांच्यावर हल्ला होणे ही दुर्दैवी घटना असल्याचेही खासदार रक्षा खडसे म्हणाल्या. खासदार रक्षा खडसे यांनी या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.