मुंबई : राज्यात तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीची प्रक्रिया सुरु आहे. 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर उद्या म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत आर सादर करण्यातही मुदत देण्यात आली होती. मात्र ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्याने राज्यातील अनेक उमेदवारांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे राज्य सरकारने अर्ज भरण्याची मुदत 15 दिवसांनी वाढवली आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयानं ट्विट केली आहे.
काय म्हंटलंय ट्विटमध्ये
राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देणार आली आहे. तसंच आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत.
राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ.
आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त.
अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 29, 2022
अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. या निर्णयामुळे अनेक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. ज्या उमेदवरांचे कागदपत्र अडकले होते किंवा वेळेवर मिळाले नव्हते अशा उमेदवारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. तर ज्या उमेदवारांचे फॉर्म तांत्रिक अडचणींमुळे अडकले होते अशानाही दिलासा मिळाला आहे.