बुलढाणा : शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून आपलं उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करीत असतो. मात्र काही व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागते. अनेक ठिकाणी कापूस मोजणी करताना काटा मारण्याचे प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातील समोर आला आहे.
संग्रामपुर तालुक्यातील लाडनापूर शिवरात एका शेतात आदिवासी शेतकऱ्यांची कापूस खरेदी सुरू होती. या दरम्यान कापूस मोजणीत काटा मारण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी कापूस व्यापाऱ्याला चांगलाच चोप दिला. ह्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
कापूस मोजणीत काटा मारणाऱ्या व्यापाऱ्याला दिला शेतकऱ्यांनी चोप.. संग्रामपुर तालुक्यातील लाडणापूर शिवारातील घटना..#Buldhana #ViralVideo #Farmer pic.twitter.com/giPpygAR1I
— Satish Daud Patil (@Satish_Daud) November 29, 2022
पोलिसांनी केली मध्यस्थी
आदिवासी शेतकऱ्यांना जास्त भावाचे आमीष दाखवून दिवसाढवळ्या कापूस व्यापारी लुटत असल्याचा प्रकर लाडणापूर शिवारात घडला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोजमाप करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करित प्रकरण शांत केले.