पुणे : एकीकड कडाक्याची थंडी वाढत असताना राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सकाळी धुके, दुपारी उन्हाचा तडाखा तर सध्याकाळी दमट वातावरणाचा फटका लोकांना बसत आहे. दरम्यान या वातावरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात उसाचा गळीत हंगाम सुरू असल्याने पावसामुळे यावर परिणाम होऊ शकतो.
यंदा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अशात आता रब्बी हंगामावर पावसाचे सावट दिसून येतेय.
राज्यात मागच्या दोन दिवसांपासून अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे थंडी कमी झाली आहे. सकाळी धुके, दुपारी उन्हाचा तडाखा तर सध्याकाळी दमट वातावरणाचा फटका लोकांना बसत आहे. दरम्यान या वातावरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात उसाचा गळीत हंगाम सुरू असल्याने पावसामुळे यावर परिणाम होऊ शकतो.
अरबी समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. यातच उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या अभावामुळे राज्यात गारठा कमी झाला आहे. दुपारी उन्हाचा चटका वाढला असून, उकाड्यात वाढ झाली आहे. दरम्यान गोवा, कोकणासह, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. राज्याच्या कमाल, किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.