जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा दूध संघाच्या अर्ज माघारी प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झाले असून दुध संघ निवडणूकित आ. किशोरअप्पा पाटील यांच्या ‘खेळी’ ने सर्वानाचं आश्चर्याचा धक्का दिला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे किशोरअप्पा पाटील यांनी ‘राजकारणातील मुरब्बी’ पणा दाखवून दिला आहे.
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघातून माजी आमदार दिलीप वाघ यांना मानणारा मोठा वर्ग आहे, आमदार किशोरअप्पा पाटील यांनी विधानसभेच्या दोन पंचवार्षिक निवडणूक आमने सामने लढल्या आहेत, विधानसभा असो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेहमीच दोघे कट्टर विरोधक म्हणून दिसले मात्र राजकारणात कायम कोणीच कुणाचा मित्र किंवा शत्रू नसतो असं म्हटलं जातं आणि हेचं दूध संघाच्या निवडणुकीत या दोनही नेत्यांनी दाखवले असावे.
आमदार किशोरअप्पा पाटील यांच्या माघारीने दिलीप वाघ बिनविरोध…
शिवसेना शिंदे गटाचे पाचोऱ्याचे आमदार किशोरअप्पा पाटील यांनी दूध संघ निवडणूक माघारीच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ बिनविरोध निवडून आले. दिलीप वाघ यांनी भाजप – शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याचे आश्वासन दिल्याने आ. किशोरअप्पा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे सांगण्यात येतं असले तरि आमदार किशोरअप्पा पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता ही महत्वपूर्ण ‘खेळी’ खेळली असावी असं बोललं जातं आहे.
आमदार किशोरअप्पा पाटील शिंदे गटात सामील झाल्यापासून पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघांचे राजकीय चित्र बरंच बदललं आहे. स्वर्गीय आर. ओ. तात्या यांच्या कन्या वैशालीताई पाटील यांनी देखील राजकारणात सक्रिय होऊन किशोरअप्पा यांच्या समोर मोठं आव्हान उभं केलं आहे.तसेच आमोल शिंदे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत लावलेली ताकद हे सर्व पाहता आमदार किशोरअप्पा पाटील यांनी आपल्या आगामी विधानसभेच्या विज्यासाठी आतापासून भूमिका ठरविणे आवश्यक आहेच, असं असलं तरि आमदार दिलीप वाघ यांच्याकरिता किशोरअप्पा पाटील यांच्या माघारीने सर्वानाचं धक्का दिला आहे.
आगामी विधानसभेला माजी आमदार दिलीप वाघ पाठिंबा देतील का?
जळगाव जिल्ह्यात प्रतिष्टेची झालेली दूध संघाची निवडणूकित माजी आमदार दिलीप वाघ यांच्या करिता किशोर पाटील यांनी घेतलेली माघार पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत दिलीप वाघ हे किशोरअप्पा पाटील यांना पाठिंबा देतील का हे येणाऱ्या निवडणुकीतचं समजेल, पण असं झाल्यास किशोरअप्पा पाटील यांना विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्याचा मार्ग सुकर होईल असं बोललं जातं आहे.