Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चंद्र काबीज करण्यासाठी चढाओढ! ड्रॅगन करतोय नासाशी स्पर्धा, स्वतःचे बेस स्टेशन उभारणार

Pravin Sapkale by Pravin Sapkale
November 28, 2022
in Featured, राष्ट्रीय
0
चंद्र काबीज करण्यासाठी चढाओढ! ड्रॅगन करतोय नासाशी स्पर्धा, स्वतःचे बेस स्टेशन उभारणार
ADVERTISEMENT
Spread the love

जागतिक स्तरावर चंद्रावर जाण्याची स्पर्धा पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. जगातील सर्व बलाढ्य देशांकडून चंद्रावर कायमस्वरूपी वस्तीसाठी योजना आखल्या जात आहेत. अशा परिस्थितीत चीनने चंद्रावर मोठे बेस स्टेशन बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधनातील अमेरिकेचे वर्चस्व कमी करण्याच्या उद्देशाने चीनने हे बेस स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे चीनने म्हटले आहे.

चीनचे हे बेस स्टेशन अणुऊर्जेवर आधारित असेल असे बोलले जात आहे. यामुळे भविष्यातील चंद्रावर सोडण्यात येणाऱ्या मोहिमांमध्ये अंतराळवीरांना मदत होईल.

2028 पर्यंत पूर्ण होणार मोठे लक्ष्य!

चीनच्या मून एक्सप्लोरेशन प्रोग्रामचे प्रमुख वू वेरन यांनी एका चिनी टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘आम्ही आता आमचे स्वतःचे बेस स्टेशन उभारणार आहोत. ही नवीन प्रणाली चंद्रावरील स्टेशनची उच्च उर्जा आवश्यकता पूर्ण करेल. आमचे अंतराळवीर 10 वर्षांत चंद्रावर पोहोचतील. आम्ही हे स्थानक चीनचे नॅशनल स्पेस एडमिनिस्ट्रेशन आणि रशियन स्पेस एजन्सी रोस्कोसमॉस यांच्या सहकार्याने विकसित करत आहोत. आणि ते 2028 पर्यंत पूर्ण होईल

एक मेगावाट वीज निर्मिती

चीनी मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे बेस स्टेशन 1 मेगावॅट वीज निर्माण करू शकते, जे शेकडो घरांना वर्षभरासाठी वीज पुरवण्यासाठी पुरेसे आहे. अणुऊर्जेपासून निर्माण होणारी वीज ऑक्सिजन निर्माण करणे, उपकरणे चालवणे आणि पाणी काढणे अशा इतर गोष्टींसाठी वापरण्यात येणार आहे. मॅकॅक्सिन ग्लोबलच्या अहवालानुसार, चीनने स्थापन केलेल्या या बेस स्टेशनमध्ये प्रामुख्याने लँडर, हॉपर, ऑर्बिटर आणि रोव्हर तयार केले जातील. हे चंद्र स्टेशन चालवण्यासाठी अणुऊर्जेचा वापर केला जाणार आहे. उच्च उर्जेमुळे बेस स्टेशन दीर्घकाळ चालण्यास मदत होईल.

ऑक्सिजन उत्पादन आणि पाण्याचा शोध

अणुऊर्जेच्या प्रणाली त्या संपर्क यंत्रणांना ऊर्जा पुरवण्यासाठी काम करतील, जी पृथ्वीशी सतत संपर्क ठेवण्याचे काम करतील. याशिवाय ही ऊर्जा चंद्राच्या पृष्ठभागावरून पाणी काढण्यात आणि तेथील प्रवाशांसाठी ऑक्सिजन तयार करण्यात मदत करेल. स्थानकात मोठे रोव्हर बसवण्यात येणार असून त्याचा वापर वाहतुकीसाठी केला जाणार आहे. यासोबतच हॉपर्स ही पुढील पिढीची साधनं असतील, जी पाणी शोधण्याचे काम करतील.

चीनच्या हालचालींवर नासाची प्रतिक्रिया

चीनच्या या घोषणेवर अमेरिकन अंतराळ संस्था नासाची प्रतिक्रिया समोर आली आहे. चंद्रावर कब्जा करण्याच्या उद्देशाने चीन आपल्या लष्करी अंतराळ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून याचा विचार करत असल्याचे नासाचे म्हणणे आहे. मात्र बीजिंगने हा आरोप साफ फेटाळून लावला आहे. 2013 मध्ये चीनने चंद्रावर पहिले मानवरहित लँडिंग केले होते. आता या देशाला या दशकाच्या अखेरीस आपले अंतराळवीर चंद्रावर उतरवण्याची आशा आहे.

Spread the love
Tags: base stationChinamission moon
ADVERTISEMENT
Previous Post

श्रद्धा हत्याकांडाप्रमाणेच आणखी भयानक घटना समोर ; आई-मुलानेच बापाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले, अन्

Next Post

गायरान जमिनीबाबतचा तो निर्णय मागे घ्या…जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर भगवान सोनावणे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
गायरान जमिनीबाबतचा तो निर्णय मागे घ्या…जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर भगवान सोनावणे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन

गायरान जमिनीबाबतचा तो निर्णय मागे घ्या...जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर भगवान सोनावणे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us