अकोला : धावती ट्रेन पकडण्याच्या नादात अनेकांना जीव गमवावा लागलाय. रेल्वेकडून धावती ट्रेन (Train) पकडू नये अशा सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र तरीही लोक त्यातून काही धडा घेताना दित नाहीत. दरम्यान, अशातच अकोला येथे धावती ट्रेन पकडण्याच्या नादात एक महिला रेल्वेखाली जाता जाता वाचली आहे. आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे महिलेचा जीव वाचला आहे.
अनेक लोक धावती ट्रेन पकडतात. यात तोल गेल्यावर आपल्या जिवाचे काही बरे वाईट होऊ शकते असा कोणताही विचार न करता धावती ट्रेन पकडतात. आतापर्यंत यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. अशात सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अकोला येथे एक महिला रेल्वे अपघातात थोडक्यात बचावली आहे. महिला काचीगूडा एक्सप्रेस पकडत असताना तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. महिला रेल्वे खाली जाण्याची भीती होती. मात्र त्यावेळी प्लॅटफॉर्मवर असलेल्या आरपीएफ जवानांनी देवदूतासारखं धावून जात तिचा जीव वाचवला.
Video: अकोला रेल्वे पोलिसाने वाचविले महिलेचे प्राण, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर#Akola #AkolaNews #ViralVideo #MarathiNews
Video Credit: Jayesh Gavande pic.twitter.com/uW8zU0vtjU
— Akshay Baisane | अक्षय बैसाणे (@Baisaneakshay) November 27, 2022
सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बी. आर. धुर्वे असं महिलेचा जीव वाचवलेल्या आरपीएफ जवानाचं नाव आहे. अक्षय बैसाणे यांनी त्यांच्या ट्वीटर (Twitter) अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी आरपीएफ जवानाने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं कौतुक करत आहेत.