गुजरात – भाजपाचं टेन्शन वाढलं असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही, कारण गुजरात विधानसभा निवडणूक आणि सत्ता स्थापने बाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी भविष्यवाणी केली असून भर पत्रकार परिषद सुरु असतांना सर्व मीडिया प्रतिनिधी समोर थेट कागदावर अरविंद केजरीवाल यांनी लिहून दिलं आणि खाली सही पण केली आहे. अरविंद केजरीवालांच्या या दाव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे.
अरविंद केजरीवाल यांची आज दिनांक २७ नोव्हेंबर रोजी गुजरातमध्ये पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचाच विजय होईल असा दावा केला आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी थेट कागदावर विजय होणार असल्याचं लिहून दिलं आहे. पंजाब निवडणुकीच्या प्रचारावेळी देखील अरविंद केजरीवाल यांनी अशाच पद्धतीने कागदावर लिहून दिले होते.
पंजाब विधानसभा निवडणुकीत चन्नीसाहेब, नवज्योतसिंग सिद्धू, प्रकाशसिंग बादलसाहेब असे सगळे दिग्गज पराभूत होऊन ‘आप’चं सरकार येईल, असं मी सांगितलं होतं. त्यावेळी कुणी विश्वास ठेवला नाही. आताही मी भविष्यवाणी करतोय, गुजरातमध्ये २७ वर्षांच्या कुशासनाचा अंत होऊन यंदा आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करेल, असं सांगतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोऱ्या कागदावर त्यांनी लिहलं त्याखाली आपली सही करुन गुजरात जिंकण्याचा ठाम आत्मविश्वास व्यक्त केला.
गुजरात में आम आदमी पार्टी की सरकार बन रही है। 31 जनवरी तक OPS (Old Pension Scheme) लागू कर देंगे। https://t.co/EZyKvmYsLN
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 27, 2022
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचलाय. भाजपकडून मोदी शहा प्रचाराच्या रणांगणात उतरलेत, राहुल गांधी यांनीही ‘भारत जोडो यात्रे’तून उसंत घेऊन गुजरात रणमैदानाच्या प्रचारात उपस्थिती लावली तर अरविंद केजरीवालांनीही सभांचा धडाका लावत विरोधकांना धडकी भरवली आहे.