मुंबई : गटाचे आमदार प्रताप सरनाईक पत्नी, दोन्ही मुलं आणि सुना व नातवंडांसोबत तुळजा भवानी मातेच्या दर्शनाला आले होते. यावेळी सरनाईक यांनी तुळजा भवानी मातेला तब्बल ७५ तोळे सोनं अर्पण केलंय. बोललेलं नवस पूर्ण केल्याचं सरनाईक यांनी म्हंटलं.
पहिल्या मुलाच्या लग्नाच्या वेळी ५१ तोळं सोन्याची पादुका आणि दुसऱ्या मुलाच्या लग्नाच्या वेळी २१ तोळ्याच्या सोन्याचा हार अर्पण करण्याचा नवस केला होतो. दोन वर्षांपासून हे दागिने त्यांच्याकडं होते. पण, दोन वर्षांपासून मंदिर बंद असल्यामुळं तो नवस आता फेडण्यात आलाय. सरनाईक यांच्या या दाव्यानंतर विरोधकांनी प्रश्न उभे केलेत.
हे पण वाचा..
.. आता याचा हिशेब तर द्यावाच लागेल ; विरोधकांच्या टीकेवर मंत्री गुलाबराव भडकले
खळबळजनक! लॉजवर नेवून माजी सरपंचाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
नाशिकमधील चलन नोट प्रेसमध्ये बंपर भरती ; 95000 पगार मिळेल, त्वरित अर्ज करा
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात केलेल्या खर्चाची चौकशी करणारी ईडी या सोन्याची चौकशी कधी करणार, असा प्रश्न विरोधकांनी विचारलाय. या ७५ तोळं सोन्याची किंमत ३७ लाख ५० हजार रुपयांच्या घरात आहे.