नंदुरबार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळली होती. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. मात्र यानंतर शिंदे गटाकडून 50 खोके घेण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. 50 खोके एकमद ओक्के’ असा नारा विरोधकांकडून दिला जात आहे. ही बोचरी टीका शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. यावरून शिंदे गटाचे सदस्य राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त करत सवाल उपस्थित केला आहे.
पश्चिम बंगालमधील एका मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीकडे 27 कोटी रुपये सापडल्याचा हिशेब मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.रोख रक्कम मोजण्यासाठी 27 मशीन लागल्या होत्या. मग 50 खोके नेण्यासाठी एक ट्रक तर लागेल असा पलटवार केला. त्यामुळे आता विरोधकांना 50 खोके सत्ताधाऱ्यांनी कसे नेले, याचा हिशेब तर द्यावाच लागेल, नाही का?
नंदुरबार येथील पाणी पुरवठ्यासंदर्भातील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.