बेंगळुरू : कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका खासगी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला मुलींचे अर्धनग्न व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थ्यावर वसतिगृहातील विद्यार्थिनींचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा बसवल्याचा आरोप आहे. तसेच त्याने 1200 हून अधिक अर्ध-नग्न व्हिडिओ आणि मुलींचे फोटो रेकॉर्ड केले. पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शुभम एम आझाद आहे.
पोलिसांनी सांगितले की, शुभमने त्याच्या मैत्रिणीचे अर्धनग्न फोटोही क्लिक केले होते. असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मुलींनी त्याला वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा फिक्स करताना पकडल्यानंतर तो नुकताच हॉस्टेलमधून पळून गेला होता. होसाकेरेहल्लीजवळील एका खाजगी महाविद्यालयात घडलेली ही घटना अधिका-यांनी वसतिगृहात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर उघडकीस आली, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपीला यापूर्वीही अटक करण्यात आली होती
यापूर्वीही त्याने असेच कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आणि त्याला पकडण्यात आले. लेखी माफीनामा सादर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी पुढे सांगितले की, महाविद्यालयाच्या प्राध्यापकाच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा फोन जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, त्याच्या फोनमधून 1200 हून अधिक व्हिडिओ आणि फोटो जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपीकडे आणखी एक फोन असून त्यात आणखी व्हिडिओ असू शकतात.
संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल
वरिष्ठ पोलीस अधिकारी पी कृष्णकांत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आरोपी हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्याने हे घाणेरडे कृत्य केले आहे. या कारणास्तव, आम्ही संबंधित कलमांखाली त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. तक्रारीच्या आधारे आम्ही तपास करत आहोत. या प्रकरणी आम्ही लवकरच गुन्हा दाखल करून तपास सुरू करणार आहोत.
ते पुढे म्हणाले, ‘तपासातून मिळालेल्या माहितीबद्दल मी सध्या बोलू शकत नाही. व्हिडिओबद्दल अधिक माहिती गोळा केली जाईल. तो इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असून तो बिहारचा आहे.