नंदुरबार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी शिर्डीच्या दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी सपत्नीक शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं. मात्र या दौऱ्यादरम्यान ते ज्योतिष पाहायला गेले असल्याची चर्चा सुरु असून यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करायला सुरुवात केली आहे. आता त्यावर राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. मुख्यमंत्री स्वतःचं भविष्य बघणार नाही, तर तेच भविष्यकाराचं भविष्य सांगतील. असा आमचा नेता आहे, असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे.
नेमकं काय म्हणले गुलाबराव पाटील?
या प्रकरणावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, की मुख्यमंत्र्यांना भविष्य पाहण्याची गरज नाही. ते भविष्यकाराचे भविष्य सांगतील. कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून मुख्यमंत्री तिकडे गेले असतील. एकनाथ शिंदे हे स्वतःचं भविष्य तयार करणारा माणूस आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे ते कोणालाही भविष्य दाखवणार नाही, असा दावा पाटील यांनी केला.
मुख्यमंत्री स्वतःचं भविष्य बघणार नाही, तर तेच भविष्यकाराचं भविष्य सांगतील. असा आमचा नेता आहे, असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे. नेत्याला कोणी कार्यकर्त्यांनी सांगितले तर नेता तिथे जात असतो. त्यामुळे ते गेलेही असतील, अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव यांनी दिली आहे.
हे पण वाचा..
SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल, आताच जाणून घ्या …
आजच्या दिवशी मनातील चिंता संपणार ; वाचा काय म्हणते तुमची राशी?
I just feel like… व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून उचललं टोकाचं पाऊल
दीपक केसरकर भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जातंय. त्यावरही गुलाबराव पाटील बोललेत. जे लोक हा दावा करत आहेत, त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नसल्याने अशा प्रकारचे आरोप होत असतात, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे जर महाराष्ट्रात फिरले असते तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची गरज भासली नसती.बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे महाराष्ट्रात तुम्हाला भेटायला आले असते, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
महापालिका निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलंय. महानगरपालिका निवडणूक एक प्रक्रिया असून तिला उशीर होऊ शकतो. त्यामुळे कुणी त्याचा चुकीचा अर्थ काढू नये, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.