भुसावळ : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात भुसावळ ते जळगावदरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या नॉन इंटरलॉकिंग सिस्टिमचे काम होणार आहे. त्यासाठी ५ आणि ६ डिसेंबरला रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला आहे. यामुळे ४ ते ६ डिसेंबरदरम्यान अप-डाऊन मार्गावरील तब्बल ३८ गाड्या रद्द, तर १८ गाड्यांच्या मार्ग बदलण्यात आले आहेत. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला ५ डिसेंबर रोजी भुसावळहून मुंबईला जाणाऱ्या ३ रेल्वे रद्द झाल्याने याचा परिणाम चैत्यभूमीला जाणाऱ्या अनुयायांवरही होणार आहे.
या गाड्यांच्या मार्गात बदल :
ब्लाॅकच्या काळात बिलासपूर-हापा एक्स्प्रेस ५ डिसेंबरला बडनेरा, भुसावळ, खंडवा, इटारसी, रतलाम मार्गे जाईल. हावडा-अहमदाबाद गाडी ४ डिसेंबरला बडनेरा, भुसावळ, खंडवा, भाेपाळ, रतलाम, छायापुरी मार्गे, बराेनी-अहमदाबाद गाडी २१ डिसेंबरला इटारसी, रतलाम मार्गे धावेल. अमृतसर-नांदेड गाडी ४ व ५ डिसेंबरला खंडवा, भुसावळ, अकाेला मार्गे, चेन्नई-अहमदाबाद एक्स्प्रेस ४ व ५ डिसेंबरला बडनेरा, भुसावळ, खंडवा भाेपाळ, रतलाम मार्गे, छपरा-सूरत एक्स्प्रेस ४ डिसेंबरला इटारसी, भाेपाळ, रतलाम, बडाेदा मार्गे, भागलपूर-सूरत गाडी ५ डिसेंबरला इटारसी, भाेपाळ मार्गे, अहमदाबाद-यशवंतपूर गाडी २९ नाेव्हेंबरला वसई, कल्याण, पुणे, दाैंड मार्गे, पुरी-अाेखा गाडी ४ डिसेंबरला बडनेरा, भुसावळ, खंडवा, इटारसी, भाेपाळ मार्गे, बनारस-हुबळी गाडी ४ डिसेंबरला खंडवा, भुसावळ, बडनेरा, बल्लारशाह, सिकंदराबाद, वाडी मार्गे धावेल. दानापूर-उधना एक्स्प्रेस ४ डिसेंबरला इटारसी, भाेपाळ, रतलाम मार्गे जाईल. पुरी-सूरत, सांत्रागाची-पोरबंदर, पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस ४ डिसेंबरला बडनेरा, भुसावळ, खंडवा, इटारसी, रतलाम, बडाेदा मार्गे धावेल. निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस ४ डिसेंबरला बिना, रतलाम, बडाेदा मार्गे, यशवंतपूर-अहमदाबाद गाडी २७ नाेव्हेंबर व ४ डिसेंबरला दाैड, पुणे, कल्याण, वसईमार्गे धावेल. रामेश्वरम-अाेखा एक्स्प्रेस २५ नोव्हेंबर व २१ डिसेंबरला अंकाई, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई मार्गे जाईल.
रद्द केलेल्या गाड्या अशा
भुसावळ-जळगाव दरम्यान होत असलेल्या कामामुळे 5 डिसेंबर रोजी नागपूर-पुणे एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, रेवा-राजकोट एक्स्प्रेस, नंदुरबार-भुसावळ एक्स्प्रेस, भुसावळ-नंदुरबार एक्स्प्रेस, अमरावती-सुरत एक्स्प्रेस, अहमदाबाद-नागपूर एक्स्प्रेस, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणेद्य-जबलपूर एक्स्प्रेस, अमरावती मुंबई-एक्स्प्रेस, गोंदिया-मुंबई एक्स्प्रेस, भुसावळ-कटनी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
4 डिसेंबर रोजी या गाड्या रद्द
नागपूर-पुणे एक्स्प्रेस, राजकोट-रेवा एक्स्प्रेस, सुरत.-अमरावती एक्स्प्रेस, नागपूर-अहमदाबाद एक्स्प्रेस, भुसावळ-बांद्रा एक्स्प्रेस, बांद्रा-भुसावळ एक्स्प्रेस ही गाडी 4 आणि 6 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. मडगाव-नागपूर एक्स्प्रेस, जबलपूर पुणे एक्स्प्रेस, कटनी-भुसावळ एक्स्प्रेस, तसेच 5 आणि 6 डिसेंबर रोजी सुरत-भुसावळ, भुसावळ-सुरत, देवळाली-भुसावळ शटल, भुसावळ-देवळाली शटल, भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, भुसावळ-कटनी या गाड्या रद्द करण्यात आल्या असून
कटनी-भुसावळ एक्स्प्रेस ही गाडी सुध्दा 4 व 6 असे दोन दिवस रद्द करण्यात आली आहे.