मुंबई : मुंबई : महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता शिंदे-फडणवीस सरकार वीज दरवाढीचा शॉक देणार आहे. राज्यात किमान 60 पैसे प्रति युनिट वाढ होणार असल्यामुळे वीज बिल किमान 200 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आधीच घेतला आहे. आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दरवाढ होणार आहे. वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने 1500 कोटी रुपये राखीव ठेवले होते. तो निधी 2021 मध्येच संपला आहे. त्यामुळे महावितरणने 1 एप्रिल 2022 मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली.
राज्यात महानिर्मिती 7 औष्णिक वीज प्रकल्पांमधून 30 संचांद्वारे वीजनिर्मिती करत असते. सप्टेंबर अखेरपर्यंत कंपनीला 34 हजार 806 कोटींचा वीज खरेदी खर्च आला. त्यामुळे आता याचा खर्च आता सर्वसामान्यांकडून वसूल केला जाणार आहे.त्यामुळे वीज दरवाढ केली जाणार आहे.
हे पण वाचा..
आजच्या दिवशी मनातील चिंता संपणार ; वाचा काय म्हणते तुमची राशी?
I just feel like… व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून उचललं टोकाचं पाऊल
MSRTC Bharti : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांसाठी भरती, इतके वेतन मिळेल?
सध्या हे शुल्क १.३० रुपये प्रति युनिट इतके आहे. आता पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांची वाढ करणार आहे. त्यामुळे इंधन शुल्कचा दर हा 2 रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. महावितरणकडून जुलैपासून 1.35 रुपये प्रति युनिट वाढ करण्यात आली असून इंधन दर आकारला जात आहे. ही मुदत नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे. आता हा आकार 1.90 रुपये असू शकतो. इंधन समायोजन आकार वाढवला नाहीतर तर पुढील वर्षी वीज दरवाढ अटळ असल्याचे सांगितले जात आहे.