सिन्नर (प्रतिनिधी)- समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष धर्म सेवक डॉ. सोन्या काशिनाथ पाटील यांच्या संकल्पनेतून सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील दीपावली सणाचे औचित्य साधून सिन्नर शहरातील संभाजी नगर येथील वंचित गरीब ,गरजू , व दुर्बल घटकातील कुटुंबातील महिलांसाठी भाऊबीज भेट हा उपक्रम रविवार दिनांक २०/११/२०२२ रोजी संभाजीनगर गणपती मंदिर सिन्नर येथे मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते गणरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच राजमाता जिजाऊ,अहिल्यादेवी होळकर तसेच महिलांना शिक्षण देणाऱ्या आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमास समाजकल्याण न्यास चे अध्यक्ष डॉ. सोन्या काशिनाथ पाटील , दैनिक समर्थ गावकरीचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस ह.भ.प.डॉ विश्वास आरोटे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव तथा दैनिक स्वराज्य तोरण संपादक डॉ किशोर पाटील सौ. मेघा पावसे नगरसेविका,योगेश शिंदे जिल्हाध्यक्ष समाज कल्याण न्यास अहमदनगर, राजू सानप अध्यक्ष बंधन फाउंडेशन,प्रीती वायचळे, तारा ढमाले , जेष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख विजय शेळके नाशिक युवा सेनेचे नेते लोकेश दादा धनगर सामाजिक कार्यकर्ते चंदर शिंदे आदि मान्यवर व मोठ्या संख्येने समाज कल्याण न्यास चे सर्व पदाधिकारी, सदस्य, संभाजी नगरातील महिला वर्ग, जेष्ठ नागरिक, युवक वर्ग, मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी आहे या भूमी मधील वंचीत आदिवासी घटकातील महिला ,विद्यार्थी यांच्यासाठी समाजकल्याण न्यास महाराष्ट्रभर विविध उपक्रम राबवत असते त्यामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप,मोफत आरोग्य सेवा,गरजू कुटुंबातील मुलींचे स्वखर्चाने लग्न समारंभ आयोजित करणे ,आरोग्य शिबिर, नेत्र चिकित्सा शिबिर, रक्तदान शिबिर भिवंडी मॅरेथॉन स्पर्धा असे अनेक समाजोपयोगी कार्य समाजकल्याण न्यास या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. विशेष म्हणजे जिवा महालाचे तेरावे वंशज यांना देखील घर बांधून त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न सोडविला हे कार्य देखील मोठे कौतुकास्पद आहे.
हाच उद्देश समोर ठेवून धर्म सेवक डॉ. सोन्या पाटील यांच्या संकल्पनेतून कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता समाज सेवेसाठी सदैव एक पाऊल पुढे ही भावना मनी धरून महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यक्रम राबवत असतो, तसेच आज समाजकल्याण न्यास चे सिन्नर तालुकाध्यक्ष संतोष ढमाले यांच्या सहकार्याने संभाजी नगर सिन्नर येथे भाऊबीज भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, या कार्यक्रमात गरिब, गरजू वंचित व दुर्बल घटकातील ३०० महिलांना उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते भाऊबीज म्हणून मायेची साडी भेट म्हणून देण्यात आली. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले या उक्तीप्रमाणे रंजल्या गांजल्यांसाठी मदतीला धावणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणजे समाज कल्याण या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा धर्म सेवक डॉ.सोन्या पाटील होय असे यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना संपादक डॉ. किशोर पाटील यांनी सांगितले.
वर्षाचे ३६५ दिवस विविध उपक्रम राबविणारे डॉक्टर सोन्या पाटील हे आज आमच्या नाशिक पावन भूमीतील सिन्नर शहरातील संभाजीनगर या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेले आहेत खरंच आज एकादशी असल्यामुळे चांगला सुवर्ण महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय याचा सार्थ अभिमान आज मला झाला, आमचे सहकारी मित्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव तथा दैनिक स्वराज्य संपादक डॉक्टर किशोर पाटील, नाशिक शहराचे अध्यक्ष विजय शेळके तसेच सर्वच ज्ञानवंत, बुद्धिवंत, गुणवंत व भाग्यवंत या व्यासपीठावर उपस्थित आहेत.
त्याचप्रमाणे समोर बसलेल्या सर्व महिला भगिनी आपल्या भाऊरायाची भेट घेण्यासाठी तसेच आपल्या भाऊरायाला देखील आपल्या बहिणीचे नाते किती पवित्र आहे हे आज आपल्या समाजामध्ये या ठिकाणी पहावयास मिळाले, दिवाळीचा सण सुरू झाल्यानंतर पहिली भेट ही माझ्या घरात नको तर संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरातील नागरिकांपर्यंत पोहचावी तसेच रस्त्यावरून जात असलेल्या महिला व पुरुष यांना देखील ती भेट देऊन त्यांच्या घरामध्ये गोडवा निर्माण करण्याचे काम समाज कल्याण न्यास चे अध्यक्ष डॉक्टर सोन्या पाटील यांच्या सर्व सदस्यांकडून केले जाते, संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे हा दीपावलीचा उपक्रम जरी असला तरी देखील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ,गणवेश वाटप, छत्र्या वाटप, स्कूल बॅग वाटप ,असे वेगवेगळे उपक्रम ते राज्यभर करत असतात, समाज कल्याण न्यास या संस्थेच्या माध्यमातून हे काम संपूर्ण राज्यभरामध्ये कसे पुढे जाईल यासाठी सर्व पदाधिकारी हे काम करीत असतात म्हणून मी परमेश्वराला एकच विनंती करेन की आज एकादशी आहे व माझ्या आयुष्यातील दोन दिवस डॉक्टर सोन्या पाटील यासारख्या माणसाला मिळो व त्यांना चांगले दीर्घायुष्य लाभो तसेच चांगले काम करण्याची संधी मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो सोन्या पाटील हे स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेने काम करीत आहेत त्यांनी सांगितले आहे की माझी संस्था ही राजकीय नसून सामाजिक क्षेत्राचे काम करते व हे काम करीत असताना गोरगरीब दिन दुबळ्यांचे दुःख सावरण्याचे काम माझ्याकडून घडत आहे त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो, गेल्या अनेक वर्षापासून हे कार्य सुरू असून या कार्याला कोणतेही गालबोट अजून पर्यंत लागले नाही त्यामुळे संघटनेचे काम हे वेगाने सुरू आहे भविष्यात देखील त्यांचं काम असेच सुरू राहील या सदिच्छा व्यक्त करतो, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्या या कार्याला जेवढे शक्य होईल तेवढे सहकार्य करू व हे काम महाराष्ट्रा पुरते मर्यादित न राहता देश पातळीवर कसे नेता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे मत दैनिक समर्थ गावकरीचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस ह.भ.प. डॉ.विश्वासराव आरोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राजू सानप यांनी केले.तर सुत्रसंचालन विजय बोतले यांनी केले.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण्याचे सर्व पदाधिकारी तसेच संतोष ढमाले ,रवींद्र ढमाले,मेघा होळकर, वैशाली ढमाले,शिवशंभो मित्रमंडळाच्या सर्व युवा सभासदांनी विशेष परिश्रम घेतले,