जालंधर: एकीकडे महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. मात्र दुसरीकडे जालंधरमधून एक विचित्र प्रकार समोर आलेय. जालंधरमधील एका चामड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या व्यक्तीने दावाय की, चार तरुणींनी दारू पाजून त्याच्यावर बलात्कार केला आहे. तसेच, तरुणींनी हात बांधून गाडीतून अपहरण केल्याचेही त्याने सांगितले. अद्याप याप्रकरणी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केलेली नाही.
या व्यक्तीने सांगितले की, तो जालंधरच्या कपूरथला रोडवर असलेल्या एका लेदर फॅक्टरीत काम करतो. तो घरी जात होता, यादरम्यान एक पांढऱ्या रंगाची कार त्याच्याजवळ येऊन थांबली. त्यात 4 मुली बसल्या होत्या, त्यांनी डोळ्यात कुठलातरी पदार्थ घातला आणि गाडीत ओढले. मुलींनी त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली, हात बांधले आणि दारू पाजली.
हे पण वाचा..
एका चार्जवर 240 किमी धावणारी ई-स्कूटर लाँच ; किंमत फक्त इतकी?
विवाहितांसाठी खुशखबर.. मोदी सरकार देणार वर्षाला ५१ हजार रुपये! फक्त हे काम करावं लागेल
Accident News : भीषण अपघातात यावल पं. स.चे गटविकास अधिकारी ठार
व्हिडीओ बनवून तरुणीवर केला वारंवार बलात्कार, पाच जणांविरुद्ध गुन्हा
चारही मुली दारूच्या नशेत असल्याचे तरुणाने सांगितले. त्यांनी त्याला अज्ञात ठिकाणी नेले आणि त्यालाही जबरदस्तीने दारू पाजली. यानंतर तो दारूच्या नशेत असताना तरुणींनी त्याच्यावर अतिप्रसंग केला. सर्वकाही झाल्यानंतर गाडीतून त्याला परत फॅक्टरीसमोर सोडले आणि पळ काढला. चेहऱ्यावरुन तरुणी चांगल्या घरातील असल्याचेही त्या तरुणाने सांगितले आहे. अद्याप याप्रकरणी त्याने तक्रार दाख केलेली नाही. तरुणाकडून माहिती घेऊन गुप्तचर विभाग तपास करत आहे.