एका लिफ्टमध्ये तरुण एका मुलीची छेड काढत असल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. पण मुलीनं त्याला असा धडा शिकवला की तो आयुष्यात कधी विसरू शकणार नाही.
एक तरुण लिफ्टमधून बाहेर जाताना दिसतो. पण त्याच फ्लोअरवर एक तरुणी लिफ्टमध्ये जात असल्याचं पाहून तो पुन्हा लिफ्टमध्ये येतो. यानंतर तो तरुणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला तरुणी दुर्लक्ष करते. पण तरुणाकडून पुन्हा गैरवर्तन होत असल्याचं पाहून ती आक्रमक होते आणि टवाळखोर तरुणाच्या जोरदार कानशिलात लगावते. तरुणीच्या एका थपडेत तरुण बिथरता. त्यानंतर तरुणी पुन्हा त्याला लाथ मारते आणि टवाळखोर जागीच कोसळतो.
https://twitter.com/LockerRoomLOL/status/1594052601791717377
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @LockerRoomLOL नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. अवघ्या ५५ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत १ लाख ७७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर ६ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.