नवी दिल्ली: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात असलेले केजरीवाल सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. मसाज व्हिडिओनंतर आता सत्येंद्र जैन हॉटेलसारखे जेवण खाताना सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. तिहार तुरुंगातील सूत्रांकडून मिळालेल्या ताज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांना तुरुंगात योग्य जेवण मिळत असल्याचे दिसत आहे.
न्यूज एजन्सी एएनआयच्या माहितीनुसार, सत्येंद्र जैन यांच्या ताज्या व्हिडिओमध्ये ते योग्य आहार घेताना दिसत आहेत, जेवण ज्या पद्धतीने पॅक केले आहे, त्यावरून असे दिसते की ते हॉटेल किंवा बाहेरचे खाद्यपदार्थ आहे. याचा अर्थ त्यांना दररोज समान अन्न मिळत आहे. तुरुंगात सत्येंद्र जैन यांचे वजन 8 किलोने वाढले होते, तर सत्येंद्र जैन यांचे वजन 28 किलोने कमी झाल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले होते.
#WATCH | Latest CCTV footage sourced from Tihar jail sources show Delhi Minister Satyendar Jain getting proper food in the jail.
Tihar Jail sources said that Satyendar Jain has gained 8 kg of weight while being in jail, contrary to his lawyer's claims of him having lost 28 kgs. pic.twitter.com/cGEioHh5NM
— ANI (@ANI) November 23, 2022
सत्येंद्र जैन यांचा हा व्हिडिओ अशावेळी समोर आला आहे, जेव्हा त्यांच्या जेवणाचे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे. न्यायालयात सत्येंद्र जैन यांनी दावा केला की, तिहार तुरुंगात त्यांना योग्य आहार मिळत नाही, तसेच त्यांची योग्य वैद्यकीय तपासणीही केली जात नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही ईडी संवेदनशील माहिती प्रसारमाध्यमांना लीक करत असल्याचा आरोप जैन यांचे वकील राहुल मेहरा यांनी केला.