अमळनेर : नाशिक येथे शासकीय कामानिमित्त जात असताना झालेल्या भीषण अपघात यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडलीय. एकनाथ चौधरी असे अपघात ठार झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. हा अपघात अमळनेर तालुक्यात झाला.
याबाबत असे की, यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे नाशिक येथे शासकीय कामानिमित्त आज दि.23 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास वाहन क्रमांक एम.एच.19 डी.व्ही.4199 ने जात होते. अमळनेर तालुक्यातील बोहरा फाटा या ठिकाणी पावणे सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. त्यात चौधरी हे जागीच ठार झाले तर गाडीवरील चालकाला किरकोळ दुखापत झाली.
भरधाव वेगात असलेल्या गाडीने उभ्या ट्रकला ठोस दिल्याची प्राथमिक माहिती आहे. एकनाथ चौधरी यांच्याकडे अमळनेर पंचायत समितीच्या कार्यभार होता शिवाय यावल पंचायत समितीच्या प्रभारी कार्यभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता.