मुंबईः राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास चार महिन्याचा काळ उलटला. तरी अद्यापही पूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही झालेला नाहीय. पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडल्यानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अशातच या विस्ताराबाबत एक मोठी बातमी समोर आलीय.
हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडेल, अशी माहिती एकनाथ शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी दिली आहे. त्यानंतर सर्वच चर्चांना विराम मिळेल, असं वक्तव्य जैस्वाल यांनी केलंय. एकनाथ शिंदे गट तसेच भाजपातील आमदारांपैकी अनेक इच्छुक कॅबिनेटच्या विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. विशेषतः शिंदे गटातील आमदारांची अस्वस्थता वारंवार दिसून येतेय. मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला स्थान मिळेल, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळालेल्या आमदारांमध्ये औरंगाबादचे संजय शिरसाट, तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांची नाराजी वारंवार दिसून आली. बच्चू कडू यांनी तर मोठं शक्तिप्रदर्शन केलं. त्यामुळे शिवसेनेशी बंडखोरी करून बाहेर पडलेल्या किती आमदारांना आगामी टप्प्यात मंत्रिपद मिळेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
येत्या 19 डिसेंबर रोजी नागपूर येथे महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच हिवाळी अधिवेशन नागपुरात झाली. मात्र महाविकास आघाडी सरकार याला अपवाद ठरलं. कोरोना संकटामुळे तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हे अधिवेशन नागपुरात होऊ शकलं नाही. जवळपास दोन वर्षांच्या गॅपनंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे.
हे पण वाचा..
धक्कादायक ; गॅस गिझरला गळती, बाथरुममध्ये १६ वर्षीय मुलाचा मृत्यू