जळगाव,(प्रतिनिधी): जिल्ह्यातील एरोंडल येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे बाथरूमच्या गिझरमधून गॅस गळती झाल्यामुळे गुदमरून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना एरंडोल येथील रेणुका नगरात सोमवार दिनांक २१ रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.यश वासुदेव पाटील असे या मुलाचे नाव आहे. यश हा काबरे विद्यालयात १०वी वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील व्ही. टी. पाटील हे त्याच शाळेत शिक्षक आहेत.
Gas geyser leak, 16-year-old boy dead in bathroom
यश हा अंघोळीसाठी गेला होता,बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने त्याच्या आई-वडिलांनी बाथरुमचा दरवाजा ठोठावला. त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने काही वेळानंतर बाथरुमचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता, तो मृत असल्याचे घोषित करण्यात आले.गॅस गिझरच्या गळतीमुळे यश याचा गुदमरुन मृत्यू झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.एरंडोल ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी यशचे शवविच्छेदन वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांनी केले.सोमवारी रात्री उशिराने यश याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.