जळगाव,(प्रतिनिधी)- भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील ‘वाद’ सर्वश्रुत असून अनेकदा यांच्यातील वादाची चर्चा संपूर्ण राज्यभर रंगताना दिसते मात्र आज Girish Mahajan यांनी Eknath Khadse यांना मोठा इशारा दिल्याने पुन्हा जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपा नेते गिरीष महाजन यांनी मला जास्त बोलायला लावू नका, यातच खडसेंचं भलं आहे, अशा शब्दांत गिरीश महाजनांनी इशारा दिला आहे.
दरम्यान Girish mahajan यांना मुलगा असता तर तोही राजकारणात असता, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाला गिरीश महाजनांनी आज प्रत्युत्तर देतांना महाजनांनी म्हटलं की, Eknath khadse यांना एक मुलगा होता, त्यांच्या मुलाचा मृत्यू कसा झाला? हे तपासण्याची गरज आहे, खडसेंना माझा प्रश्न आहे की त्यांनाही मुलगा होता. त्याचं काय झालं? याचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला? हे तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, यातच खडसेंचं भलं आहे, असा थेट इशारा गिरीश महाजन यांनी दिला.
एकनाथ खडसे अस्वस्थ झाले आहेत आजकाल ते काय काय बोलताय त्याचं त्यांना भान राहत नाही. ते बेभान झालेले आहेत. कधी मला चावट म्हणताहेत, तर कधी बदनामी करा म्हणत आहेत. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे. त्यांच्या अनेक ठिकाणच्या भानगडी, चौकशा यात सबळ पुरावे मिळत असल्यानेच ते अस्वस्थ आल्याचे गिरीष महाजन म्हणाले.