जळगाव दि २१ (प्रतिनिधी) : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज District Planning and Development Council (DPDC) jalgaon समितीची बैठक पार पडली. यात जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२३-२४ यासाठी तब्बल ५६९ कोटी ८० लक्ष रूपयांची तरतूद असणाऱ्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली. तर नियोजनच्या राज्यस्तरीय बैठकीत आपण जिल्हा विकासासाठी अजून १०० ते १५९ कोटी रूपयांची अतिरिक्त तरतूद करणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिली. सन २०२२-२३ च्या पुंर्नियोजन प्रस्तावास मंजुरी दिली असून या बैठकीत चालू वर्षातील ५९९ कोटी रूपयांच्या खर्चाचा आढावा देखील घेण्यात आला. जिल्ह्याचा विकास करतांना शेतकरी केंद्रबिंदू मानून तसेच सामान्य माणसांची बांधिलकी ठेऊन विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असून निधी अभावी रखडलेल्या प्रकल्पांना चालना देऊन प्रलंबित व नव्याने सुचाविलेली कामे मार्गी लावण्यासाठी कटीबद्धआहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.
District Planning and Development Council (DPDC), jalgaon
जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी सहकार्य आणि आत्मियतेने सर्व यंत्रणांनी काम करावे असे आवाहन करून कामे दर्जेदार व विहीत मुदतीत पुर्ण करून प्रशासकीय दिरंगाई व कामाच्या गुणवत्तेतील चालढकल खपून घेणार नसल्याचा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
नियोजन समितीच्या सभागृहात आयोजीत या बैठकीला खासदार रक्षाताई खडसे, उन्मेष पाटील,आमदार सर्वश्री एकनाथ खडसे,संजय सावकारे, चिमणराव पाटील,
राजूमामा भोळे, चंद्रकांत पाटील, अनिलदादा पाटील , मंगेशदादा चव्हाण, श्रीमती लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी अमन मित्तल , पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया,जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आणि विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तर अन्य लोकप्रतिनिधी आणि District Planning and Development Council (DPDC) चे सदस्य सहभागी झाले होते.बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जिल्हा प्रशासनातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील , ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन तसेच उपस्थित खासदार व आमदार यांचे यांचे स्वागत केले.
५७ कोटी २४ लक्षच्या ९५७ ट्रान्सफार्मर व अनुषंगिक कामांचे लोकार्पण
शेतकऱ्यांसाठी शेती व गावठाण भागासाठी ट्रान्स फार्मर (रोहित्र) साठी डीपीडीसी मध्ये दरवर्षी भरीव तरतूद केली आहे. ३ वर्षात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कारकिर्दीत ५७ कोटी २४ लक्ष ८२ हजार रुपये निधी खर्च करून तब्बल ९५७ ट्रान्स फार्मर (रोहित्र) शेती व गावठाण भागासाठी बसविण्यात आले आहे. आज झालेल्या District Planning and Development Council (DPDC) च्या बैठकीत या रोहीत्रांचे व अनुषंगिक कामांचे लोकार्पण गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सन २०२३ – २४ साठी ५६९ कोटी ८० लाखाच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी !जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण SCP/TSP -OTSP) ठळक बाबी
याप्रसंगी सन २०२३-२४ च्या जिल्हा वार्षिक योजना प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली. यात सर्वसाधारण योजनांच्या अंतर्गत ४३२ कोटी २९ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जाती उपयोजना म्हणजेच एससीपीच्या अंतर्गत या आराखड्यात ९१ कोटी ५९ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्र म्हणजेच टिएसपी-ओटीएसपीच्या अंतर्गत या आराखड्यात ४५ कोटी ९२ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. सन २०२३-२४ च्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण SCP/TSP -OTSP) च्या रु. ५६९ कोटी ८० लाखाच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली. शासकीय कार्यान्विन यंत्रणांकडून एकूण मागणी ६०८ कोटी ५७ लक्ष इतकी होती.
सन २०२३-२४ पुनर्विनियोजनाच्या प्रस्तावाला मिळाली मान्यता !
District Planning and Development Council (DPDC) च्या बैठकीत सन२०२२ – २३ च्या चालू वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजना पुनर्विनियोजन प्रस्तावाला देखील मंजुरी प्रदान करण्यात आली. यात सर्वसाधारण योजनेत यात शिक्षण,तंत्रशिक्षण,ग्रंथालय,आरोग्य ,कौशल्य विकास, सहकार, पर्यटन, रेशीम,कृषी, लपा भूसंपादन इत्यादि योजनांमध्ये रु.36 कोटी 55 लक्ष 28 हजार इतकी बचत प्राप्त झाली असून ती बचत, लम्पी आजार, लपा योजना, CMGSY, विद्युत,शासकीय इमारती (नियोजन भवन दुरुस्ती) मृद व जलसंधारण, पोलीस वाहने या साठीची रु.36 कोटी 55 लक्ष 28 हजार ची तरतूद पुनर्विनियोजना व्दारे केली आहे.
सन २०२३ – २४ च्या खर्चाचा आढावा
वार्षिक योजना २०२२-२३ मध्ये सर्वसाधारण योजनेत ४५२ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ६६ कोटी २० लाख ५४ हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला असून वितरीत निधी पैकी ५४ कोटी १६ लाख १९ हजार इतका खर्च करण्यात आला आहे. SCP उपयोजनेत ९१ कोटी ५९ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी २ कोटी ९१ लाख १९ हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला असून वितरीत निधी पैकी ०२ कोटी ९० लाख ४९ हजार इतका खर्च करण्यात आला आहे. तर टिएसपी – ओटीएसपी योजनांसाठी ५५ कोटी ९१ लाख ७१ रूपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ०५ कोटी ६४ लाख ७८ हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला असून वितरीत निधी पैकी ३२ लाख १५ हजार इतका खर्च करण्यात आला आहे. एकूण एकंदर खर्च ५९९ कोटी ५० लाख ७१ हजार पैकी ५७ कोटी ३८ लाख ८३ हजार खर्च झाला आहे. शासनाकडून कामांना असलेल्या स्थगितीमुळे निधी अप्राप्त होता. त्यामुळे यावर्षाचा आजपावेतो ९.५७ टक्के खर्च झालेला आहे.
पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले निर्देश !
District Planning and Development Council (DPDC)बैठकीत खासदार, आमदार व नियोजन समितीच्या सदस्यांनी या महिन्याच्या अखेरीस पर्यंत कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले. सर्व यंत्रणांनी युध्द पातळीवर प्रयत्न करून निधीचा पूर्ण विनीयोग करण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. प्रशासकीय मान्यता, वर्क ऑर्डर आदी प्रक्रिया तात्काळ पार पाडण्याचेही त्यांनी सांगितले. १०० % निधी खर्च होण्याबाबत प्रशासनाने सज्ज राहण्याचे आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केले.
जिल्हाधिकारी यांच्या शासकीय यंत्रणांना सुचना !
यावेळी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी विविध लेखशीर्ष निहाय माहितीचा आढावा सादर केला. प्रशासकीय विभागांना जिल्हा नियोजन समितीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या नेत्यांची नियोजन करून मार्च 23 अखेर प्राप्त सर्व निधीचा खर्च परिपूर्ण होईल तसेच निधीचा वापर हा अनुषंगिक कामांसाठी वापरला जाईल तसेच गुणवत्तापूर्वक कामे होतील याकडे विभाग प्रमुखांनी व्यक्तिशः लक्ष देण्याचे जिल्हाधिकारी मिळतील आणि निर्देश दिले.तसेच बैठकीत उपस्थित संबंधित प्रश्नांची अनुषंगिक उत्तरे दिली.
????????हे वाचण्यासाठी क्लिक करा…
Business idea ; महाराष्ट्रात कुक्कुट पालन कर्ज योजना सुरु… जाणून घ्या आवश्यक कागदपत्रांची यादी
महाराष्ट्रातील ‘या’ गावात आजही चक्क ‘पोर्तुगीज’ भाषा बोलली जाते…
Jalgaon District Tourist Spot ; जळगाव जिल्ह्यातील ११ महत्वाचे पर्यटन स्थळ पहा…
हिवाळ्यात मुळा खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे ; जाणून घ्या काय आहेत??
पेरू खाण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क..! काय आहेत जाणून घ्या…