रावेर,(प्रतिनिधी)- रावेर कुषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नियमितपणे Buffalo buying and selling market त्वरित सुरू करावा अशी मागणी म्हैस खरेदी-विक्री व्यापारी व रावेर तालुक्यातील दुग्धव्यवसायिक, दुध उत्पादक शेतकरी यांनी केली आहे.म्हैस खरेदी विक्री व्यवहार बंद असल्याने सर्वसामान्य दुध खरेदी वर्गाची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असल्याने रावेर-सावदा या बाजार समितीच्या आवारात नियमितपणे भरणारा बाजार तात्काळ सुरु करावा अशी मागणी केली आहे.
रावेर -सावदा परिसरात मोठ्या संख्येने दुध उत्पादक शेतकरी,दुध उत्पादक व्यावसायीक तसेच म्हैसची मोठ्या संख्येने खरेदी विक्री करणारे लहान छोटे, मोठें व्यवसायिक व ह्या व्यवसायांवर आधारित रिक्षा,गाडी चालकांना ही मोठ्या प्रमाणावर आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे, म्हैस खरेदी विक्री व्यापारी यांनी ह्या व्यवसायांवर होणारी उलाढाल ठप्प झाली असल्याने त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली असल्याने त्यांचे बरेचसे व्यवहारात कोंडी झाली आहे, ह्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होऊन त्यांच्यांत नैराश्य आले असून ते पुर्णपणे हतलब झाले आहेत, आर्थिक टंचाई, बेरोजगारी, नैराश्य यामुळे त्यांच्या मानसिकतेत बदल होऊन त्यांचा समतोल बिघडला आहे म्हणून शासनाने लवकरात लवकर फेर विचार करून म्हैस खरेदी विक्री बाजार समितीच्या आवारात नियमितपणे रितसर शासनाच्या नियमानुसार म्हैसचा बाजार सुरू करावा अशी मागणी केली आहे.
????????हे वाचण्यासाठी क्लिक करा….