शहडोल : शिक्षक हा विद्यार्थ्यांचे भविष्य घडवितो. मात्र गुरु आणि शिष्यातील नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित विद्यार्थिनी गर्भवती राहिल्यानंतर शिक्षकाने स्वतःचे पाप झाकण्यासाठी पीडित विद्यार्थिनीची हत्या केली.
मध्य प्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात ही घटना घडली होती.विद्यार्थिनीच्या हत्येमुळे आपण केलेले गैरकृत्य उजेडात येणार नाही, असा समज आरोपी शिक्षकाने केला होता. आरोपी शिक्षकाने अल्पवयीन मुलीच्या भावनांशी खेळ करून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. गर्भवती राहिल्यानंतर विद्यार्थिनी शिक्षकावर लग्नासाठी दबाव टाकत होता.
यातून तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी विद्यार्थिनीला कायमची संपवण्याचा कट रचला. विद्यार्थिनीला औषध आहे सांगत विष प्यायला दिले. त्यात विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. हत्येचा गुन्हा लपवण्यासाठी पीडितेचा मृतदेह गावच्या विहिरीत फेकला. या घटनेनंतर आरोपी शिक्षकाने पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून पोबारा केला होता. तसेच विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी कुणावरही संशय व्यक्त केला नव्हता, त्यामुळे पीडितेच्या मृत्यूचे गूढ होते.
हे पण वाचा..
महाराष्ट्रातील ‘या’ गावात आजही चक्क ‘पोर्तुगीज’ भाषा बोलली जाते…
राहुल गांधींच्या सभेत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहत असताना घडला खूप विचित्र प्रकार
पेरू खाण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क..! काय आहेत जाणून घ्या
यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेत पोलीस आरोपी शिक्षकापर्यंत पोहचली. पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेत चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केले.