महाराष्ट्राची मातृभाषा ‘मराठी’ असली तरि त्या त्या भागातील स्थानिक भाषा देखील बोलल्या जातात हे सर्वांनाच माहिती आहे मात्र आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील एका गावात आजही चक्क पोर्तुगीज भाषा बोलली जाते. पोर्तुगीज ही महाराष्ट्रात बोलली जाणारी भाषा नक्कीच नाही मग या गावात का? बरं ही भाषा बोलली जाते… या गावातील लोकांवर या भाषेचा इतका प्रभाव कसा असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतीलचं चला तर मग आपण जाणून घेऊया तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे …
Portuguese speaking Koralai village in maharashtra
प्रथम तर आपण महाराष्ट्र राज्यातील त्या गावाचे नाव जाणून घेऊ….तर ते गाव आहे महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील चौल जवळचं छोटंसं गाव ‘Koralai‘ कुंडलिका नदीच्या जवळ कोकणातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या मुरुड तालुक्यातील ह्या गावात आजही चक्क पोर्तुगीज भाषा बोलली जाते.देशाला स्वातंत्र्य मिळण्या आधीपासून हे ‘Koralai‘ गाव पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते. त्यामुळे पोर्तुगीज शैलीचा प्रभाव आपल्याला या गावामध्ये दिसून येतो.
हे तर सर्वांनाच माहिती आहे की पोर्तुगीज व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले तेव्हा सुरुवातीला त्यांनी गोव्यात तळ ठोकला आणि नंतर कोकणाकडे मोर्चा वळवला. वसईमध्ये त्यांचे मुख्य केंद्र होते. तर रेवदंडा, कल्याण, ठाणे आणि मुंबईच्या सात बेटांपर्यंत पोर्तुगीजांची सत्ता होती. हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात असताना पोर्तुगीजांचे हे मोठे व्यापारी केंद्र होते. सन १५२० ते १७४० या काळात पोर्तुगीजांचे या भागात राज्य होते.
कोर्लई गावात पोर्तुगीज काळातील चर्च आणि किल्ला आहे. पण इथले वैशिष्टय म्हणजे इथली नॉलिंग भाषा आहे. पोर्तुगीज आणि मराठीच्या मिश्रणातून नॉलिंग भाषा बनली आहे. ही नॉलिंग भाषा या कोर्लईमध्ये बोलली जाते. या भाषेची कोणतीही लिपी नाही. इथे शिक्षण, सर्व व्यवहार मराठी भाषेतून होतात. मात्र बोलीसाठी नॉलिंग भाषा वापरली जाते.
शेतातील कामे करताना, लग्न, समारंभ अशा वेळी पोर्तुगीज भाषेत गाणी गायली जातात.पोर्तुगीज चार शतकांपूर्वी गेले मात्र त्यांच्या काही पाऊलखुणा अजूनही जपून ठेवत आहे.लिपी नसल्यामुळे तोंडी बोलूनच ही भाषा एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जात आहे. अशा पद्धतीने या भाषेने सुमारे चार शतकांचा प्रवास आजवर केला आहे.