जामनेर : हल्ली अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर होत असलेले अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना जामनेर तालुक्यात घडलीय.
जामनेर तालुक्यातील एका खेडेगावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी जगदीश अशोक पवार (जामनेर तालुका) या संशयित तरुणाविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
हे पण वाचा …
Post Office : पोस्टाची ‘ही’ योजना आहे खूप खास ; 100 रुपयांची बचत करून मिळेल मोठा नफा
आता युवासेनेला मोठं खिंडार ; 35 पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा
महाराष्ट्रातील ‘या’ खासदारावर अक्षरशः नोटांचा पाऊस ; व्हिडिओ व्हायरल
शेंदुर्णीत युवकांवर प्राणघातक हल्ला ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जामनेर तालुक्यातील एका गावात साडेसोळा वर्षीय पीडीता कुटुंबासह वास्तव्यास असून संशयीत जगदीश अशोक पवार याने गुन्हा दाखल होण्याच्या तीन महिन्यांपूर्वी वेळोवेळी लग्न करण्याचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडीत तरुणीने पहूर पोलिस स्थानक गाठत फिर्याद दिल्याने जगदीश पवार याच्याविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहेत.