मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटात सुरु असलेली गळती काही थांबताना दिसत नाही. आता अशातच युवासेनेला मोठं खिंडार पडलं आहे. युवा शिवसेनेतील युवतीसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. युवती सेना सहसचिव शर्मिला येवले यांनी आपल्या समर्थकांसह युवती सेनेचा राजीनामा दिला आहे.
शिवसेनेमध्ये दोन गट पडले असल्याने नेत्यांसबोत अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येही फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला जात असला, तरी अद्याप त्याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही. यादरम्यान दोन्ही गटांमध्ये पक्षप्रवेश सुरु असून आपली बाजू भक्कम असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला युवा सेना पदाधिकारी धक्का दिला आहे.
हे पण वाचा …
महाराष्ट्रातील ‘या’ खासदारावर अक्षरशः नोटांचा पाऊस ; व्हिडिओ व्हायरल
शेंदुर्णीत युवकांवर प्राणघातक हल्ला ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जर मी माझं पद दाखवलं तर.. गुलाबराव पाटलांचा इशारा नेमका कुणाला?
मागच्या काही दिवसात पक्षात जे सुरु आहे. त्यावर युवती सेनेच्या पदाधिकारी नाराज आहेत. अडचणीच्या काळात पक्ष सोडणं योग्य नाही पण पदाधिकारी राजीनामा देण्यावर ठाम आहेत. 35 पदाधिकारी युवतीसेना पदाचा राजीनामा देत आहोत, असं शर्मिला येवले यांनी यावेळी सांगितलं.दरम्यान, शर्मिला येवले या नीलम गोऱ्हे यांच्या निकटवर्तीय आहेत. नीलम गोऱ्हे यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु असतानाच शर्मिला यांचा हा राजीनामा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.