जळगाव,(प्रतिनिधी)– जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे काही एक कारण नसंतांना राहुल सपकाळे भारतीय बेरोजगार मोर्चा संपर्क महासचिव खानदेश प्रभारी तथा जळगाव जिल्हा अध्यक्ष यांचे भाऊ अतुल सपकाळे यांच्यावर दिनांक १७ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास ५ जणांनी धारदार तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याने खळबळ उडाली यात अतुल सपकाळे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.संगनमताने व जातीय द्वेष मनात ठेवून लोंखडी धारदार शस्त्राने हल्ला केल्या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपी अक्षय अनिल पाटील, कृष्णा बापु पाटील, सिध्देश्वर नारायण पाटील,दिपक कडुबा पाटील, सागर नाना पाटील सर्व रा. वाडी दरवाजा, शेंदुर्णी ता.जामनेर यांच्या विरुद्ध गु.र.न. व कलम CCTNS- NO ३९६/२०२२ अ. जा. ज व जमाती प्रति. अधि कलम ३(२) (५अ), भादवि ३२६, १०८, ३२३,३४ प्रमाणे पहूर पोलीस स्टेशनं येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा करित आहेत.