जळगाव (प्रतिनिधी) दि. 18 – ना. गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा व स्वच्छता ) तथा पालकमंत्री जळगांव जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 18 नोव्हेंबर, 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता, अजिंठा विश्रामगृह, जळगाव येथे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) या योजनेबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर आढावा बैठकीस किशोर पाटील, आमदार, (पाचोरा व भडगाव) मतदार संघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, (जि.प.) जळगांव, पंकज आशिया, व अरुण प्रकाश, जिल्हा अग्रणी बँक जळगांव, स्टेट बैंक ऑफ इंडिया, सेन्ट्रल बैंक ऑफ इंडिया, बैंक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नेशनल बँक या बँकांचे विभागीय / जिल्हा व्यस्थापक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जळगाव व कृषि उपसंचालक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय अनिल भोकरे, इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
सर्व प्रथम कृषि उपसंचालक श्री. अनिल भोकरे, यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले त्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. संभाजी ठाकुर, यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेंतर्गत जळगांव जिल्हयात एकुण 101 प्रकरणांचे प्रस्ताव मंजुर करण्यात आलेले आहे. असे सागितले.
सदर कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने श्रीमती रुपाली चंद्रकांत पाटोल यांना, स्टेट बैंक ऑफ इंडिया यांच्या वतीने संजय दत्तात्रय पाटील यांना, स्टेट बैंक ऑफ इंडिया, गोपाल सपकाळे यांना, सौ. निकिता अमोल पाटील यांना व सौ. जयश्री दत्तात्रय धनगर यांना, यूनियन बँक तर्फे सौ. बबिता राजेंद्र जैन यांना, सेंन्ट्रल बैंक ऑफ इंडिया, अश्विन पुंडलिक पाटील यांना पालकमंत्री यांचे हस्ते कर्ज वाटप करण्यात आले.