नवी दिल्ली : सरकार देशभरातील शिधापत्रिकाधारकांना अनेक सुविधा देत असून, त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. यासोबतच कोरोनाच्या काळापासून आतापर्यंत कोट्यवधी लोकांना सरकारने मोफत रेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जर तुम्ही देखील नियमितचे शिधापत्रकधारक असाल तर तुम्हाला देखील मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
कारण सरकारने रेशनकार्डधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच सरकारने मोफत रेशनसोबत तेल आणि मीठाची पाकिटेही मोफत मिळणार असल्याचे जाहीर केले. आता रेशन कार्डधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे, म्हणजेच यापुढे ग्राहकांना अधिकाधिक गहू आणि तांदूळाचा लाभ मिळणार आहे.
अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तर, सामान्य शिधापत्रिकाधारकांना फक्त 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ मिळेल. मात्र, यावेळी कार्डधारकांना गव्हासाठी किलोमागे 2 रुपये आणि तांदळासाठी 3 रुपये प्रतिकिलो खर्च करावा लागणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लोकांना त्याचा लाभ दिला जात आहे.
हे देखील वाचा :
कॉलेजच्या आवारातच मुलींची ‘दंगल’ ; हाणामारीचा VIDEO व्हायरल..
Gold Silver : सोन्याचे भाव आज पुन्हा घसरला, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव
POWERGRID Bharti : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये तब्बल 800 जागांसाठी भरती ; वेतन 1.20 लाखापर्यंत मिळेल
Bank Robberies : अवघ्या 1 मिनिटात लुटली SBI बँक ; पहा दरोड्याचा थरारक VIDEO
कोणाला मिळणार लाभ?
यासोबतच ज्या शिधापत्रिका चालकांकडे मीठ, तेल, हरभरा यांची पाकिटे शिल्लक आहेत, त्यांना शासनाच्या आदेशानुसार अंत्योदय कार्डधारकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य हा नियम पाळला जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. म्हणजे जो पहिला येईल त्याला तेल आणि मीठ फुकट मिळेल आणि तेल आणि मीठ संपल्यावर मिळणार नाही.
सध्या देशभरातील 80 कोटींहून अधिक लोकांना गरीब कल्याण योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र आतापर्यंत सरकारने सुमारे 10 लाख कार्डधारकांची कार्डे रद्द केली आहेत. रेशनकार्डच्या सुविधेचा लाभ अनेक अपात्र लोकही घेत आहेत, त्यामुळे सरकारने सर्व अपात्र लोकांची कार्डे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अपात्र कार्डधारकांचा डाटा डीलर्सना पाठवला जात आहे, जेणेकरून या लोकांवर कडक कारवाई करून त्यांच्याकडून रेशन वसूल करता येईल.