पुणे: उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा निशाणा साधला. तसेच . जळगावचे शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यावरही अंधारे यांनी टीका केली. चिमण आबांचं वय 73 आहे. त्यांना सभेत उचलून धरावं लागतं. तिथे गेले की थुईथुई करतात. हा चमत्कार कशाचा आहे. सत्तेचाच का ? असेही त्या म्हणाल्या. त्या काल पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटातील नेते त्यांना वारंवार गद्दार म्हणून हिणवत आहे. तसेच विरोधक शिंदे गटावर ५० खोके घेतल्याचा आरोपही करीत आहेत. यावरही अंधारे यांनी भाष्य केले. मी खोक्यांवर कधीच बोलत नाही. मला त्याचे काही घेणंदेणं नाही. गद्दारी केलेल्या माणसांनी फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाच विश्वासघात केला नाही तर मतदारांचाही केला. तिकडे गेले आणि गब्बर झाले. जागा कशी घेतात? पैसे कुठून येतात? असा सवाल अंधारे यांनी केला.
हे देखील वाचा :
POWERGRID Bharti : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये तब्बल 800 जागांसाठी भरती ; वेतन 1.20 लाखापर्यंत मिळेल
Bank Robberies : अवघ्या 1 मिनिटात लुटली SBI बँक ; पहा दरोड्याचा थरारक VIDEO
महाराष्ट्र हादरला ! 6 वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर वडिलांसह आजोबा, चुलत्याने केला बलात्कार
आमच्याकडून जे 40 आमदार गेले. त्यांचा बायोडेटा चेक करा. त्यांनी यापूर्वीही दोन ते तीन वेळा पक्ष बदलले असतील. सगळ्या पक्षांमध्ये उताणे पडल्यावर ते आमच्या पक्षात आले. लढले आणि जिंकले. आता आमची बिल्ली आम्हालाच म्याव करतेय. तिकडे जाऊन नाचत आहेत. त्यांना आता नाचण्यासाठी लग्नातच बोलवा, अशी टीकाही अंधारे यांनी केली. राज्यातील शिंदे सरकार अधिकाळ चालणार नाही. हे सरकार 2023ला पडणार आहे. त्यानंतर राज्यात निवडणुका लागतील, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.