धरणगाव : धरणगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय. मद्याच्या नशेत दिरानेच आपल्या वहिनीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून याबाबत धरणगाव पोलिसात पिडीत महिलेच्या तक्रारीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. Rape of a woman
काय आहे प्रकार?
पिडीत महिलेने आपल्या दोघं दिरांविरुद्ध पोलिसात तक्रार दिलेली होती. याचाच राग धरून ८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास दारूचा नशेत घरात प्रवेश करीत आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार का केली?, दिलेली तक्रार मागे घे. नाहीतर तुला सोडनार नाही, अशी धमकी दिली. तसेच पिडीतेला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. एवढेच नव्हे तर, तुझ्या मुलीला गुंड लावून मुंबईला उचलुन घेऊन जाऊ व तुम्हाला समाजात तोंड दाखविण्यास लायक ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तसेच पिडीता ही १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आंघोळ करीत असतांना दुसरा दीर हा गुपचुप पाहत होता. ही गोष्ट पिडीतेच्या मुलीने बघतातच त्याने तिथून पळ काढला होता.
हे देखील वाचा :
Bank Robberies : अवघ्या 1 मिनिटात लुटली SBI बँक ; पहा दरोड्याचा थरारक VIDEO
महाराष्ट्र हादरला ! 6 वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर वडिलांसह आजोबा, चुलत्याने केला बलात्कार
अशा प्रकारे संशयित आरोपींनी वेळोवेळी आपल्या वाहिनीचा वेळोवेळी विनयभंग केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.हे.कॉ उमेश भालेराव हे करीत आहेत.