अजमेर : तुम्ही अनेकवेळा चित्रपटांमध्ये बँक दरोड्याचे सीन पहिले असतील. पण या रिल लाइफपेक्षाही खतरनाक असा रिअल लाइफमधील बँक दरोड्याची घटना समोर आली आहे. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील जाडन गावातील एसबीआय बँकेत दरोडा पडला. अवघ्या एक मिनिटात दोन दरोडेखोरांनी बँक लुटली आहे. या दरोड्याचा लाइव्ह थरारक व्हिडीओही व्हायरल होतो आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बँकेतील सुमारे तीन लाख रुपये हिसकावून हे चोरटे पळून गेले. SBI बँकेची ही शाखा राष्ट्रीय महामार्ग पाली-सोजत दरम्यान आहे. पोलिसांना दरोड्याची माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाचा तपास सुरू केला
पाली जिले में दिनदहाड़े जाडन एसबीआई बैंक में बंदूक की नोक पर नकाबपोश लुटेरों ने लूट की वारदात को अंजाम दिया @PoliceRajasthan @DcDmPali @TheOfficialSBI @iampulkitmittal @ABPNews @prempratap04 @srameshwaram @santprai pic.twitter.com/JacOqAzir1
— करनपुरी (@abp_karan) November 17, 2022
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती बँकेत हेल्मेट घातलेली दिसत आहे. तर बँक कर्मचारी आपल्या डेस्कवर बसले आहेत. हेल्मेट घातलेल्या व्यक्तीच्या हातात बंदूक आहे. तो हवेत बंदुकीच्या गोळ्याही झाडतो. कर्मचाऱ्यांना धमकावतो आहे, घाबरवतो आहे. काही वेळाने आणखी एक हेल्मेट घातलेली व्यक्ती येते. जिच्या हातात बॅग आहे. ती व्यक्तीसुद्धा या कर्मचाऱ्यांना धमकी देते. त्यानंतर दोघंही तिथून निघून जातात. अवघ्या एका मिनिटाचा हा व्हिडीओ आहे. फक्त 60 सेकंदात हे सर्व घडलं आहे.