जळगाव,(प्रतिनिधी)- बदलत्या जीवन शैलीमुळे आजकाल हृदयरोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता आपली व आपल्या परिवाराची काळजी घेण्याच्या उद्देशाने दि जळगाव पीपल्स बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचलित
राजेश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल व
डॉ.कमलाकर पाटील(माजी सरपंच,फुपनी) यांच्याद्वारा दिनांक २० नोव्हेंबर रोजी Free health checkup camp आयोजित करण्यात आला असून तपासणी सर्वांसाठी खुली राहणार आहे.
Free health checkup camp jalgaon
यावेळी निःशुल्क हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असून बीपी,रक्त तपासणी (शुगर),
ईसीजी,अँजिओग्राफी,अँजिओप्लास्टी (BP, blood test (sugar), ECG, Angiography, Angioplasty) करण्यात येणार आहे.तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचे अत्याधुनिक मशिनरी व सुपरस्पेशालिस्ट कार्डियोलॉजिस्ट यांच्या साहाय्याने तपासण्या करण्यात येणार आहे.
लक्षणांनुसार आवश्यकतेनुसार स्टेप बाय स्टेप तपासण्या करण्यात येतील.काही तपासण्या ह्या जेवणाअगोदर व काही जेवणानंतर असल्याने सोबत जेवणाचा डबा व पाणी बॉटल आणणे.सोबत आधार कार्ड,रेशनकार्ड आणणे मर्यादित रुग्ण तपासणी असल्याने नावनोंदणी आवश्यक आहे.अगोदर ट्रीटमेंट सुरू असल्यास सोबत फाईल आणणे.ज्यांना बीपी,शुगर,चालताना धाप लागते असे त्रास आहेत तसेच 40 वर्षावरील नागरिकांनी निश्चितच तपासणी करून घ्यावी.
वेळ – सकाळी ८ ते १
ठिकाण :- राजेश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल,जळगाव
अधिक महितीसाठी संपर्क
9970316922/9764769642
डॉ.कमलाकर पाटील
(मा.सरपंच,फुपनी ता.जि. जळगाव)