अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना. मोटार वाहन प्रशिक्षण ही योजना १९७२ पासून लागू करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत सुरुवातीस महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत मोटर वाहन चालक प्रशिक्षण देण्यात येत होते.
तथापि महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाने प्रशिक्षण देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील बेरोजगार युवकाना मोफत मोटार वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देऊन त्याना स्वावलंबी करणे व त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उचावणे, मागासवर्गीयांना व्यवसायिक संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने राज्यात मोटर वाहन चालकाचे प्रशिक्षण मान्यता प्राप्त संस्थांकडून देण्याची योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निणर्य दिनांक ४ फेब्रुवारी २००८ नुसार कार्यान्वित करण्यात आली मोटर वाहन चालक प्रशिक्षण देणान्या संबंधीत संस्थेचा करारनामा दिनांक ४ फेब्रुवारी २०१५ रोजी संपुष्टात आल्याने सन २०१५- १६ पासून Motor Vehicle Driver Training Scheme Scheduled Castes and Neo-Buddhists बंद होती. तद्नंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक मोवाप्र- २०१७ /प्र.क्र. १३५ / शिक्षण, दिनांक २३ फेब्रुवारी २०१८ नुसार सुधारीत नियमावलीप्रमाणे सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे.
Motor Vehicle Driver Training Scheme for Scheduled Castes and Neo-Buddhists
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील उमेदवारांना खाजगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन चालकाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थ्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत परीक्षा घेऊन वाहन चालविण्याचा परवाना दिला जातो. प्रशिक्षण पूर्ण होऊन संबंधितांना परवाना मिळाल्यानंतर शासनाने विहित केलेल्या शुल्काची प्रतिपूर्ती प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस अदा केली जाते. प्रशिक्षणार्थी उमेदवार हे मोटर वाहन परिवहन अधिनियम, तरतुदीनुसार वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता, जातीचा दाखला इत्यादी अटींची पूर्तता करणारे असावेत, सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बरोजगार युवकांसाठी मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजनेस लेखाशिर्ष क्रमांक २२२५-सी-९५६ २२२५-३७०७ व २२२५-०१८१ अंतर्गत रक्कम रुपये ५.०० कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्पीत करण्यात आलेली आहे.
अनुसूचित जातीच्या व नवबौध्द युवकांना मोफत मोटार वाहन चालविणे व वाहकाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करून त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचाविणे. मागासवर्गीयांना व्यावसायिक संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने राज्यातमोटार वाहन व वाहकाचे प्रशिक्षण देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे.
लाभाचे स्वरूप:-
1) उमेदवारांना खाजगी ड्रायव्हीग स्कूलमध्ये प्रशिक्षण देण्यात येते.प्रत्येक सत्रात किमान ५० उमेदवारांना प्रवेश देण्यात येतो.त्याच प्रमाणे वाहकाचे (चालक) मोफत प्रशिक्षण देण्यात येते.
2) प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थ्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत परीक्षा घेऊन वाहन चालविण्याचा परवाना दिला जातो.तर वाहकास प्रशिक्षणानंतर बॅच देण्यात येतो.
3) प्रशिक्षण पूर्ण होऊन संबंधितांना परवाना / बॅच मिळाल्यानंतर शासनाने विहित केलेल्या शुल्काची प्रतिपूर्ती प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस अदा केली जाते.
योजनेच्या अटी व शर्ती :- प्रशिक्षणार्थी उमेदवार हे मोटार परिवहन अधिनियम तरतुदीनुसार वयोमर्यादा,शैक्षणिक अहर्ता शारीरिक पात्रता,जातीचा दाखला,इत्यादी कागदपत्राची पूर्तता करणारे असावेत.
संपर्क :- संबधित जिल्ह्याचे विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी.