अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांचा जात वैधता कॅम्प 22 व 23 नोव्हेंबर रोजी
जळगाव दि. 17 – जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव मार्फत इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील मागासवर्ग (अनु. जमाती वगळून) विदयार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी जाहीर आवाहन करण्यात येत आहे. अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणा-या विदयार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते परंतु विदयार्थी समितीकडे वेळेत अर्ज सादर करीत नाहीत.
त्यामुळे विदयार्थी शैक्षणीक तसेच इतर लाभापासून वंचित राहतात. सर्व विदयार्थ्यांना व महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विनती करण्यात येते की सर्व महाविदयालयांनी अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याचे अर्ज आपल्या महाविदयालयात ऑनलाईन फॉर्म भरुन नोडल अधिकारी मार्फत तात्काळ या कार्यालयाकडे सादर करावे. वेळेत अर्ज न भरल्यास महाविदयालयांना जबाबदार धरण्यात येईल.
आजपर्यंत या समितीकडून ऑनलाईन वैधता प्रमाणपत्र एकुण 41992 वितरीत करण्यात आलेले आहेत. सदर प्रवर्गातील इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतली व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विदयार्थ्याचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहीत वेळेत ऑनलाईन भरुन त्याची एक साक्षांकीत प्रत पुरावे जोडून (ऑफलाईन) पद्धतीने 29 नोव्हेंबर 2022 पर्यत कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव यानी केले आहे.
दिनांक 22 व 23 नोव्हेंबर, 2022 रोजी दोन दिवसीय त्रुटी पुर्तता कॅम्प आयोजित करण्यात आला असून ज्यांच्या प्रकरणात त्रुटी आहे अशांनी मूळ कागदपत्रांसह जिल्हा जात पडताळणी समिती जळगांव येथे कॅम्पच्या दिवशी हजर राहून त्रुटी पूर्तता करावी.
टिप- ऑनलाईन फॉर्म भरतांना घ्यावयाची काळजी
1) अर्जदाराने ऑनलाईन फॉर्म भरतांना स्वताचा किंवा पालकांचा ई-मेल आयडी व मोबाईल न. नमूद करावा. कारण वैधता प्रमाणपत्र समितीकडून ऑनलाईन ई-मेलवर पाठविण्यात येते. तसेच त्रुटी असेल तर तेही ई-मेलवर पाठविण्यात येते.
2)ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर 30 दिवसांच्या आत समिती कार्यालयात जमा करावे. 3)ऑनलाईन फॉर्म भरतांना मुळ (Original) कागदपत्रे अपलोड करावी, तसेच ऑनलाईन फॉर्मची हार्ड कॉपी व कागदपत्रे राजपत्रित अधिका-यांची सहीने साक्षांकीत करून कार्यालयात सादर करावी. असे सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव बी.यु.खरे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
पालकमंत्री गुलाबराव पाटील शुक्रवार रोजी जिल्हा दौऱ्यावर
जळगाव, दि. 17 – राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. शुक्रवार, दि. 18 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता पाळधी तालुका जळगाव येथून शासकीय वाहनाने अजिंठा विश्रामगृह जळगाव कडे प्रयाण, सकाळी 11.00 वाजता गिरणा मोठा प्रकल्प ता. नांदगाव प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीचे रब्बी हंगाम 2022-23 ची बैठक स्थळ – अजिंठा विश्रामगृह जळगाव. सोयीनुसार अजिंठा विश्रामगृह जळगाव येथून शासकीय वाहनाने पाळधी ता. धरणगाव कडे प्रयाण, सोयीनुसार पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
000000
राजस्थान विधानसभा जयपूर डॉ. श्री. सी.पी. जोशी स्पीकर हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर
जळगाव दि. 17 – राजस्थान विधानसभा, जयपूर चे मा.डॉ. श्री. सी.पी.जोशी स्पीकर हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे… शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर,2022 रोजी सायं 8.48 वाजता मुंबई येथुन राजधानी एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व स्थानीक कार्यक्रमांना उपस्थिती व शासकीय वाहनाने विश्राम गृहाकडे रवाना व मुक्काम.
शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर,2022 रोजी दुपारी 12 वाजता जळगाव जामोद जि. बुलढाणा कडे (रस्ते मार्गे) स्थानिक कार्यक्रमानिमित्त प्रस्थान रात्री 8.०० वाजता जळगाव जामोद जि. बुलढाणा येथून (रस्ते मार्गे) जळगावकडे प्रस्थान, रात्री 10.30 वाजता जळगाव येथे आगमन व शासकीय वाहनाने विश्रामगृह येथे मुक्काम रविवार दिनांक 20 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 9.50 वाजता जळगाव रेल्वे स्थनकावरुन रेल्वेने बीई एलटीटीई एक्सप्रेसने मुंबईकडे प्रस्थान.
०००००
रब्बी हंगामासाठी पाणी अर्ज 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत
कार्यालयीन वेळेत किंवा पोष्टाने सादर करावेत
जळगाव दि. 17 – वाघुर धरण विभाग जळगाव कार्यक्षेत्रातील वाघुर डावा कालवा व उजवा कालवा तसेच कालवा उपसा व जलाशय उपसा या प्रकल्पावर शक्य असेल तेथे कालव्याद्वारे (प्रवाही) तसेच अधिसुचीत / अनाधिसुचित लाभक्षेत्रातील नदी, नाला व इतर जलाशयातून उपसा सिंचनाने पाण्याचा उपयोग घेणा-या सर्व बागायतदारांना कळविण्यात येते की, चालू वर्षी प्रकल्पात उपलब्ध झालेल्या पाणी साठ्यानुसार रब्बी हंगाम 15 ऑक्टोंबर, 2022 ते 28 फेब्रुवारी 2023 या मुदतीत कपाशी, ज्वारी, गहु, हरभरा, बारमाही भाजीपाला इतर तेलबिया कडधान्य व भूसार पिके इत्यादी पिकांसाठी पिण्याचे पाण्याचे आरक्षण व्यतिरीक्त उपलब्ध साठ्यातुन खालील अटीस अनुसरून पाणी पुरवठा करण्याचे ठरविण्यात आले आहे. तरी खालील अटीच्या पूर्ततेसह नमुना नं. 7 पाणी अजांवर मागणी करून पाणी अर्ज 25 नोव्हेंबर, 2022 च्याआंत संबंधित वाघुर धरण उपविभाग क्र. 1 व 2 वराडसिम, वाघुर धरण उपविभाग क्र. 3 व 4 नशिराबाद या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोष्टाने अगर प्रत्यक्ष जमा करावेत.
सिंचनाच्या पाणी पुरविण्यासाठी खालील अटी व शर्ती राहतील.
उन्हखरीप हंगाम सन 2022-23 अखेर संपूर्ण थकबाकी भरणे आवश्यक राहील, पाटमोट संबंध नसावा, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रासच मंजुरी दिली जाईल, शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये, पाणी अजांच्या निर्णय संबंधित उपविभाग, पाटशाखेत/ ग्रांमपंचायत कार्यालय नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल, मुदतीनंतर आलेले पाणी अर्जावर नियमानुसार जादा पाणीपट्टी आकारणी केली जाईल. मंजुर क्षेत्रसच व मंजुर पिकानांच पाणी घ्यावे लागेल. पाणी अर्ज देतांना 7/12 उतारा किंवा खाते पुस्तीका संबंधित उपविभागास दाखवावी लागेल, पाटबंधारे अधिनियम (कायदा) 1976 च्या प्रचलीत धोरणानुसार तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन आदेशानुसारच मंजुरी देण्यात येईल.
उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करून अन्नधान्याचे अधिक उत्पादन वाढवावे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचे आदेश क्र. 1 /2018 दिनांक 11 जानेवारी 2018 नुसार सुधारीत दराप्रमाणे केलेली आकारणी भरणे बंधनकारक राहील. असे उप कार्यकारी अभियंता वाघुर धरण विभाग जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
महाडीबीटी पोर्टल योजना:- अर्ज एक योजना अनेक
जळगाव दि. 17 – कृषि विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरीयोजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेंतर्गत सधन कापूस विकास कार्यक्रम शेतकऱ्यांना कॉटन श्रेडर करिता अर्ज करावयाचा आहे. सदर कॉटन श्रेडर हे SC/ST अल्प / अत्यल्प 50 टक्के कमाल रुपये 1.00 लाख /प्र.युनिट व इतर प्रवर्गाकरिता 40 टक्के कमाल रुपये 0.80 लाख /प्र.युनिट अनुदान उपलब्ध असून योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.
महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील “शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टैबलेट सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून योग्य संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. “वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा – डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल, अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा – डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.
पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर भेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.
महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली आहे यापूर्वीच अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करू शकतात ज्या शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनाचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी आपले अर्ज पोर्टलवर भरावेत. असे आवाहन करण्यात येते आहे. सर्व इच्छुक शेतक-यांनी महा डीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करावी, अधिक माहिती साठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक कृषी सहायक यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या एका पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
भूमि अभिलेख विभाग सरळसेवा भरती प्रक्रिया -2021
जळगाव दि. 17 – भूमि अभिलेख विभागातील गट क ( भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता दिनांक 9 डिसेंबर, 2022 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती.
त्यानुसार 9 ते 31 डिसेंबर, 2021 या कालावधी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत. त्यानंतर सदर अर्जदार यांना विभागाकडून दिनांक 28 फेब्रुवारी, 2022 ते 13 मार्च, 2022 या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवार यांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येवून भूमी अभिलेख विभागातील गट क पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हतेऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड केलेली आहेत. अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपुर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामान्य प्रशासन विभागाकडील 4 मे, 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन परिक्षा (Computer Based Test ) दिनांक 28 ते 30 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत IBPS कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे.
परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ( https://mahabhumi.gov.in) लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधीत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे असून प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा दयावयाची आहे.
परीक्षा पध्दतीबाबची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. तसेच परिक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची लिंक देखील 14 नोव्हेंबर, 2022 पासून विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. असे आवाहन प्र. उपसंचालक भूमि अभिलेख नाशिक प्रदेश नाशिक महेशकुार शिंदे यांनी दिलेल्या एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
गुरुवार 21 रोजी ऑनलाईन स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर
ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन
जळगाव दि. 17 – जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव या कार्यालयामार्फत गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 12 ते 12.30 या वेळेत ऑनलाईन जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मार्गदर्शन सत्रात जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव चे श्री.आर.आर.डोंगरे सर, हे मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन गुगल मिटवर करण्यांत आलेले आहे. गुगल मिट लिंक खालीलप्रमाणे
गुगल मिट लिंक-meet.google.com/nqp-jjir-ssj-Up tp 100 guest
connections
तरी जिल्हयातील जास्तीत जास्त युवक / युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००