नवी दिल्ली : सैन्यदलात महिलांच्या प्रवेशासाठी आणखी एक बंद दरवाजा उघडण्यात आला आहे. भारतीय नौदलाने महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय नौदलामध्ये आतापर्यंत फक्त पुरुषांनाच या ठिकाणी प्रवेश घेता येत होता. मात्र आता नौदलाने नेव्ही युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम महिलांसाठीही सुरू करण्यात आल्यामुळे आता महिला इंडियन नेव्हीमध्ये नोकरीही मिळवू शकतील.
केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. आता नौदलाच्या काही विभागांमध्ये नेव्ही युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमद्वारे महिलाही नोकरीसाठी अर्ज करू शकतात, असं या संदर्भातील एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान केंद्राने सांगितलं. युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमच्या माध्यमातून नेव्हीच्या एक्झिक्युटिव्ह ब्रँच जनरल सर्व्हिस (X) केडर, आयटी, इंजिनीअरिंग व इलेक्ट्रिकल शाखांमध्ये महिलांसाठी नोकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे, असं सरकारने हायकोर्टात सांगितलं.
अॅटर्नी जनरल कुश कालरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून सैन्य भरतीत महिलांबाबत भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर हायकोर्टाने सरकारला विचारलं की, सरकारने पुरुषांप्रमाणेच महिलांनाही समान संधी देण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत?
हे पण वाचा..
LPG सिलिंडरबाबत सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; ग्राहकांना मिळणार फायदा
VIDEO : ‘हा’ तर प्रेयसीच्या आठवणी…एकनाथ खडसेंची मुख्यमंत्री शिंदेंवर खोचक टीका
संतापजनक ! ‘ते मला करू दे, नाहीतर…’ काकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
याला उत्तर देताना केंद्राची बाजू मांडणारे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा म्हणाले की, याचिकेत उपस्थित केलेला मुद्दा आधीच सोडवला गेला आहे. सरकारने इंडियन नेव्ही (Indian Navy) युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमच्या माध्यमातून महिलांना नौदलाच्या आयटी, टेक्निकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल ब्रँच, एक्झिक्युटिव्ह ब्रँच जनरल सर्व्हिस केडरमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे.