पुणे : महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबत नाहीय. अशातच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. फसवणुकीच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात अटक असलेल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या 14 वर्षीय मुलीवर मावस काकानेच बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून मावस काका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना?
पीडित मुलगी मोठी कानपूर येथील आहे. तिच्या आई-वडिलांविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्हा त्यांना 30 डिसेंबर 2021 रोजी अटक झालेली आहे. सध्या ते येरवडा कारागृहात आहेत. मुलगी त्यांना भेटण्यासाठी कानपूरहून आपल्या मावस काका सोबत आली होती.
यावेळी पोलीस स्टेशन परिसरातील एका लॉजवर ते थांबले होते. यावेळी आरोपीने “मी जे काही करीत आहे, ते मला करू दे, नाहीतर तुझ्या मम्मी पप्पाची येरवडा जेलमधून बेल होऊ देणार नाही, त्यांना जेलमध्ये सडवीन अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित तरुणीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शरीर संबंध ठेवले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.