जळगाव : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या टीकेला प्रत्युत्तर देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. खडसेंनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नंदुरबार येथे गिरीश महाजन यांनी खडसेंवर टीका केली होती. एकनाथ खडसे यांना सर्व पदे ही घरातच पाहिजे, संपूर्ण कुटुंब तूप-लोणी खात असल्याची टीका महाजनांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर बोलताना खडसे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
गिरीश महाजन साधना महाजन तुमच्या कुटुंबातील की बाहेरच्या? असा सवाल करत दुर्दैवाने गिरीश महाजन यांना मुलगा नाही. नाहीतर कदाचित तो पण राजकारणात आला असता, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली आहे.
हे पण वाचा..
खडसेंना हायकोर्टाचा झटका ! आ. मंगेश चव्हाणाविरुध्दची याचिका फेटाळली
‘सॉरी बाबू…आपण स्वर्गात भेटू…’ प्रियकराकडूनच प्रेमाचा THE END!
22 वर्षीय प्रेयसीकडून लग्नासाठी दबाव, 42 वर्षीय विवाहित प्रियकराने दिला भयंकर मृत्यू
यावेळी, एकनाथ खडसेंनी संपूर्ण भाजपचीच घराणेशाही काढली. नारायण राणे, देवेंद्र फडणवीस हेदेखील घराणेशाही मधून आले असून त्यांना हा नियम लागू नाही का? त्यामुळे एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना चार बोट आपल्याकडे आहेत, याचा विचार गिरीश महाजन यांनी करावा, असा टोलाही एकनाथ खडसेंनी लगावला आहे.