मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. शिंदे-फडणवीस सरकार १ लाख तरुणांना रोजगार देणार आहे. १ लाखांहून अधिक रोजगारासाठी सरकारकडून सामंज्यस करार करण्यात येणार आहे. यासाठी राजभवन येथे हा कार्यक्रम पार पडत आहे. राज्यपाल भगतसिंग कोशयारी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे.
सरकारच्या करारामुळे बांधकाम, रिटेल, बँकिंग, हॉस्पिटॅलिटी, एव्हिएशन अशा विविध क्षेत्रात नोकरीची संधी बेरोजगारांना उपलब्ध होणार आहे. दहावी नापास ते उच्च शिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी या करारानंतर मिळणार आहे .
बेरोजगारांना नोकरी मिळण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग पुढाकार घेणार आहे. यामुळे बेरोजगार तरुण-तरुणींसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. राज्यातून प्रकल्प बाहेर गेल्यानंतर मोठा करार मानला जात आहे. विरोधकांना शिंदे-फडणवीस सरकारचे कामातून उत्तर देण्याचा उद्देश असल्याची चर्चा आहे. सरकारच्या करारामुळे बांधकाम, रिटेल, बँकिंग, हॉस्पिटॅलिटी, एव्हिएशन अशा विविध क्षेत्रात नोकरीची संधी बेरोजगारांना उपलब्ध होणार आहे. दहावी नापास ते उच्च शिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी या करारानंतर मिळणार आहे .