जळगाव,(प्रतिनिधी)- शहरातील रायसोनी नगर व परिसरातील शंभूराजे हिल्स परिसरात आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ रोजी “युडीज हेअर अँड ब्युटी स्पा” च्या टीमने स्वच्छता मोहीम राबववली. यावेळी परिसरातील रस्त्यालगत वाढलेले गवत व गटारी स्वच्छ करण्यात आले.”युडीज हेअर अँड ब्युटी स्पा” चे संचालक उदय पवार यांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या टीम कडून परिसर स्वच्छ करून घेतला, त्यांच्या या स्वच्छता सेवा उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.
वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले तर अनेक पर्यावरण समस्या कमी होतील. गावांमधील तसेच शहरांमधील रस्ते, परिसर, नदी-नाले स्वच्छ राहणे हेच अभियान राबविण्यामागील प्रमुख उद्दिष्ट असते. आपला देश स्वच्छ रहावा हेच प्रमुख लक्ष्य ठेवून स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे उदय पवार यांनी सांगितलं आहे.