नवी दिल्ली : जागतिक बाजारातून मिळणाऱ्या संकेतांदरम्यान भारतीय बाजारात तेजी दिसत आहे. सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज, मंगळवारी आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सततच्या दरवाढीने सोन्याने पुन्हा विक्रमी उच्चांक गाठला आहे. ऐन लग्नसराईत सोने दरात होत असलेल्या वाढीने ग्राहकांना झटका बसला आहे.
आज भारतीय बाजारात सोन्या-चांदीचा भाव?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर मंगळवारी वायदा बाजारात सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 52,778 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर चांदीचा दरही आज 100 रुपयांनी वाढून 62,570 रुपयांवर पोहोचला. आज सकाळी सोन्याचा भाव 52,743 रुपयांवर उघडला पण नंतर तो 52,783 रुपयांवर आला आणि काही वेळातच तो 52,778 रुपयांवर व्यवहार करू लागला.
त्याच वेळी, चांदीचा भाव 62,550 रुपयांवर उघडून 62,525 रुपयांवर गेला. मात्र, नंतर तो 62,570 रुपयांपर्यंत खाली आला. काल सोन्याचा भाव 0.71 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला होता, तर चांदीचा दर 1.50 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला होता.
हे पण वाचा..
मुलांमध्ये हा आजाराचा झपाट्याने पसरतोय.. संसर्ग घातक असू शकतो ; जाणून घ्या काय आहेत लक्षणे
जिल्हा दूध संघातल्या अपहार प्रकरणी व्यवस्थापकासह चौघांना अटक, खडसेंना धक्का
पिंपळाच्या झाडात दडलाय आरोग्याचा खजिना, मुळापासून ते पानांपर्यंत प्रत्येक भाग आहे फायदेशीर
आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत किती आहे?
आता जागतिक बाजाराबद्दल बोलूया, आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. कालच्या व्यवहारादरम्यान दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाली असली तरी आज ते तेजीचे ट्रेंड दाखवत आहेत. मंगळवारी, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.44 टक्क्यांनी वाढून 1,771.28 डॉलर प्रति औंस झाली आहे, तर चांदीची किंमतही 1.92 टक्क्यांनी वाढून 22.01 डॉलर प्रति औंस झाली आहे.